शिकागो : तेलंगाणातून अमेरिकेत उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेली एक तरुणी शिकागोच्या रस्त्यावर उपासमारीने त्रस्त आहे. हे समजल्यानंतर मुलीच्या आईने थेट केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून आपल्या मुलीला भारतात आणण्याची विनंती केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते खलेकर रहमान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे पत्र पोस्ट केले आहे.
दोन महिन्यांपासून मुलीशी संपर्क नाही : हैदराबादमधील मौलाली येथील रहिवासी असलेल्या सय्यदा लुलू मिन्हाज जैदी मास्टर्स करण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेला गेली होती. ती गेल्यापासून तिचा तिच्या आईशी फोनवर सातत्याने संपर्क होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मुलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे तिच्या आईने पत्रात लिहिले आहे. हैदराबादहून अमेरिकेला गेलेल्या काही लोकांनी तिला ओळखले आणि तिच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर तिची अवस्था तिच्या आईला कळाली आहे.
मुलीचे सामान चोरीला गेले आहे : पीडितेच्या आईला सांगण्यात आले की, कोणीतरी तिचे सामान चोरले आहे आणि ती शिकागोच्या रस्त्यावर उपाशी भटकत आहे. याशिवाय लुलू मिन्हाज मानसिक तणावाखाली आहे. त्यानंतर आता वहाज फातिमा यांनी आपल्या मुलीला भारतात परत आणण्यासाठी केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.
ओळखीच्या लोकांना मुलगी शिकागोमध्ये सापडली : फातिमा यांनी पत्रात म्हटले आहे की, 'माझी मुलगी सय्यदा लुलू मिन्हाज झैदी मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेत गेली होती. मात्र तिने मला दोन महिने झाले फोन केला नाही. हैदराबादचे आमचे काही ओळखीचे लोक अमेरिकेला गेले तेव्हा त्यांना माझी मुलगी शिकागोमध्ये सापडली. तिच्या सामानाची चोरी झाली आहे. ती उपाशी भटकत आहे. मला तिला भारतात आणायचे आहे, असे मुलीच्या आईने म्हटले आहे.
हे ही वाचा :
- Hyderabad Girl Killed In London : हैदराबादच्या विद्यार्थिनीची लंडनमध्ये हत्या, ब्राझीलच्या तरुणाला अटक
- UP Crime News : आग्रामधील भारतीय डॉक्टरला लंडनच्या कोर्टाने सुनावली 6 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
- OceanGate Titan submersible : समुद्रात बुडालेल्या टायटन सबमर्सिबलच्या मलब्यात सापडले मानवी अवशेष,अपघाताचे गुढ कळणार