ETV Bharat / bharat

KCR In Delhi : मोदींच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न जोरात.. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर दिल्लीकडे रवाना - Third Front In India

देशात भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न जोरात सुरु झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे तीन दिवसीय दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले ( Chief Minister KCR In Delhi ) असून, या दौऱ्यात ते काही राजकीय नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांचीही भेट घेतली होती.

मोदींच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न जोरात.. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर दिल्लीकडे रवाना

author img

By

Published : Apr 3, 2022, 9:48 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज दिल्लीला रवाना झाले ( Chief Minister KCR In Delhi ) आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात ते लवकरच अनेक राजकीय नेत्यांना भेटण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीसाठी राव यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही आहेत.

समविचारी पक्षांना एकत्र आणायचा प्रयत्न : भाजपविरोधी आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न तीव्र करण्यासाठी राव अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेत आहेत. फेब्रुवारीमध्ये मुंबई दौऱ्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

तेलंगणात भाजपविरोधात होणार आंदोलने : दरम्यान, शनिवारी तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) कार्याध्यक्ष आणि मंत्री केटी रामाराव यांनी घोषणा केली की, तेलंगणातून धान खरेदीवर केंद्राच्या भूमिकेविरुद्ध पक्ष निषेध करणार आहे. ते म्हणाले, "टीआरएसने केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) नेत्यांच्या विरोधात कृती आराखडा तयार केला आहे. 4 एप्रिल रोजी राज्यातील सर्व मंडल मुख्यालयांवर निदर्शने केली जातील. 6 एप्रिल रोजी टीआरएस कार्यकर्ते आंदोलन करतील. मुंबई, नागपूर, बेंगळुरू आणि विजयवाडाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर 'रास्ता रोको' करण्यात येणार आहे. 7 एप्रिल रोजी हैद्राबाद वगळता सर्व जिल्हा मुख्यालयांवर लाखो शेतकर्‍यांसह निदर्शने केली जातील. 8 एप्रिल रोजी राज्यातील 12,769 पंचायतींवर शेतकरी काळे झेंडे फडकावतील. 11 एप्रिल रोजी TRS मंत्री आणि लोकप्रतिनिधी निदर्शने करतील. पक्षाचे खासदार संसदेत विरोध करतील."

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.