ETV Bharat / bharat

KCR On Cloudburst : विदेशातून रचला जातोय भारतात ढगफुटीचा कट.. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा संशय - KCR On Cloudburst

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao ) यांनी आज पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अजब संशय व्यक्त केला ( KCR On Cloudburst ) आहे. भारतात होत असलेल्या ढगफुटीचा कट हा विदेशात रचला जात असून, त्यामागे विदेशी शक्ती असल्याचे ते ( foreign countries hatched cloudburst conspiracy in India ) म्हणाले.

KCR On Cloudburst
केसीआर संशय भारतात ढगफुटी
author img

By

Published : Jul 17, 2022, 7:56 PM IST

भद्राचलम ( तेलंगणा ) : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao ) यांनी गोदावरी पुरावर खळबळजनक टिप्पणी ( KCR On Cloudburst ) केली. काही परदेशी देशांनी भारतात ढगफुटीचा कट रचल्याचा संशय त्यांनी व्यक्त ( foreign countries hatched cloudburst conspiracy in India ) केला. केसीआर यांनी रविवारी तेलंगणातील भद्राचलममधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री केसीआर यांनी पीडितांशी संवाद साधला आणि आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर केसीआर यांनी काही परदेशी देश ढगफुटीचा कट रचत असल्याचा संशय व्यक्त केला. देशात लेह आणि उत्तराखंडमध्येही ढगफुटी झाल्याचे ते म्हणाले.

कुटुंबासाठी 10,000 रुपयांची तात्काळ आर्थिक मदत: मुख्यमंत्री केसीआर यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिनाअखेरपर्यंत अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची सूचना केली. पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून, भद्राचलम येथील पुलाच्या माथ्यावरून गोदावरीतील पाण्याच्या पातळीत वाढ त्यांनी पहिली. मुख्यमंत्र्यांनी आयटीडीएमधील आमदार आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा घेतला. पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. केसीआर यांनी घोषित केले की पीडित कुटुंबांना 10,000 रुपये तात्काळ आर्थिक मदत आणि 20 किलो तांदूळ देण्यात येईल.

काही जिल्ह्यांना तात्काळ १ - १ कोटींची मदत : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुलुगु, भूपालपल्ली, कोठागुडेम, महबूबाबाद आणि निर्मल या जिल्हा प्रशासनांना पूर मदत म्हणून प्रत्येकी एक कोटी रुपये तात्काळ जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री हरीश राव यांना पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबिरे सुरू करण्याचे निर्देश दिले. गोदावरीच्या सर्व जिल्हा दंडाधिकार्‍यांना पुरेसा औषध आणि अन्नपुरवठा सुनिश्चित केला. नदीला सतत पूर असल्याने आणखी काही दिवस सतर्क राहण्यास सांगितले.

व्यापक सर्वेक्षणाची गरज : पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी शनिवारी हैदराबादहून येथे आलेले केसीआर यांनी मंत्री, आमदार, उच्च अधिकारी, विधान परिषदेचे सदस्य आणि जिल्हा लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली. गोदावरी पुराच्या वेळी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी व्यापक सर्वेक्षण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

हेही वाचा : KCR Criticized BJP : तुम्ही तेलंगणातील सरकार पाडाल तर आम्ही तुम्हाला दिल्लीच्या सत्तेतून खाली खेचू : मुख्यमंत्री केसीआर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.