ETV Bharat / bharat

मी तुम्हाला सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल'; तेलंगणाचे मुख्यमंत्री माध्यमांवर भडकले - तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची माध्यमांवर प्रतिक्रिया

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांवर केला. मीडियाने जबाबदारीने वागायला हवे, असे ते म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव
author img

By

Published : Jun 23, 2021, 1:18 PM IST

हैदराबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी कोरोनाबद्दल चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांवर केला आहे. कोरोनाविषयी माध्यमं भीती पसरवत आहेत. मला कोरोना झाला होता. तेव्हा पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक ही दोन औषधे डॉक्टरांनी मला दिली आणि मी बरा झालो. मीडियाने जबाबदारीने वागायला हवे, असे ते म्हणाले. वारंगळ येथे सोमवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोनाबाधित असतानाचा आपला अनुभव के.चंद्रशेखर राव यांनी सांगितला. 'पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक औषधं खाऊन एका आठवड्यात मी कोरोनाच्या आजारापासून मुक्त झालो, असे त्यांनी सांगितले. के.चंद्रशेखर राव यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाविषयी आणि फंगसविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. कुठली वाहिनी की कोणता पेपर, हे माहित नाही. ही फंगस जिवंत आहे की निर्जीव, पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल', असे .चंद्रशेखर राव म्हणाले.

राज्यातील कोरोनाची स्थिती -

महत्त्वाचे म्हणजे नुकतेच तेलंगणामध्ये लॉकडाऊन बंदी उठवण्यात आली आहे. शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात गेल्या 24 तासांत 1,175 नवीन रुग्णे नोंदली गेली. तर संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 615,574 रुग्ण आढळले आहेत. तर 9,486,640 लोकांना लस देण्यात आली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 3,00,28,709
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,89,94,855
  • एकूण मृत्यू : 3,90,660
  • सक्रिय रुग्ण संख्या : 6,43,194
  • एकूण लसीकरण : 29,46,39,511

हेही वाचा - जगात भारी मानली जाणारी 'फायझर लस' भारतीयांना मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.