नवी दिल्ली - दोन तेजस रेल्वे गाड्या घाट्यात असल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानीनंतर रेल्वे मंत्रालयाची खासगी कंपन्यांद्वारे आणखी प्रवासी गाड्या चालवण्याची कोणतीही योजना नाही. या दोन्ही रेल्वे गाड्या आईआरसीटीसीद्वारे चालवल्या जात आहेत. या विषयी खासदार अनुमुला रेवंत रेड्डी यांनी प्रश्न केला होता. त्यावर सध्या खासगी ऑपरेटरकडून प्रवासी गाड्या चालवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे लेखी उत्तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Railway minister Ashwini Vaishnaw on Tejas ) यांनी रेड्डी यांना दिले.
हेही वाचा - केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान पोहोचले मथुरेत.. बांके बिहारी मंदिरात घेतले दर्शन
रेल्वे मंत्रालयाने गेल्या तीन वर्षांतील दोन्ही तेजस गाड्यांचे आकडे देखील दिले आहेत, ज्यामध्ये लखनऊ - नवी दिल्ली तेजसने 2019-20 या वर्षात केवळ 2.33 कोटींचा नफा कमावला. तेव्हापासून आयआरसीटीसी (IRCTC) द्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन्ही गाड्या तोट्यात आहेत.
दोन तेजस रेल्वे गाड्या खासगी कंपन्यांनी घेतल्यानंतर आईआरसीटीसीद्वारे त्या लखनऊ - नवी दिल्ली आणि अहमदाबाद - मुंबई या मार्गावर चालवल्या जात होत्या. या गाड्या 2019 मध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोना महामारीच्या काळात त्यांचे संचालन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आवृत्या देखील कमी करण्यात आल्या होत्या.
त्याचवेळी, सन 2019 - 20 मध्ये लखनऊ - नवी दिल्ली तेजसने 2.33 कोटींचा नफा कमावला, पण त्याच वर्षी अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजसला 2.91 कोटींचा तोटा झाला. त्याचप्रमाणे, 2020-21 मध्ये दोन्ही गाड्यांना अनुक्रमे 16.79 आणि 16.45 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय, 2021-22 मध्ये महामारीसंंबंधी निर्बंध संपल्यानंतर तोटा कमी झाला, तरीही दोन्ही खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या गाड्यांना अनुक्रमे 8.50 कोटी आणि 15.97 कोटींचा तोटा सहन करावा लागला.
हेही वाचा - Video : हृदयद्रावक.. पाऊस न झाल्याने शेतकऱ्याला कोसळले रडू.. शेतातच अश्रू अनावर