गोंडा - उत्तर प्रदेशातील आसाराम बापूंचे आश्रम पुन्हा एकदा चर्चेत आले ( Asaram Bapu Ashram In Gonda ) आहे. येथील गोंडा या आश्रम परिसरात मुलीचा मृतदेह सापडला ( Teenager Body Found In A Car ) आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, आश्रमही सील करण्यात आले आहे.
13 वर्षीय ही तरुणी मागील चार दिवसांपासून गायब होती. त्यानंतर गोंडा-बहराइचा मार्गावरील कोतवाली येथील गावात संत आसाराम बापूचे आश्रम आहे. तेथील परिसरात उभे असणाऱ्या कारमधून वास आल्यानंतर तेथील शिपायाने पाहणी केली. तेव्हा त्याला कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच डीएम डॉ. उज्ज्वल कुमार आणि एसपी संतोष कुमार मिश्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी पाच टीमला तैनात केले आहे.
वडीलांनी तीघांविरोधात दाखल केला गुन्हा - पाच एप्रिलला मुलगी गायब झाली होती. सहा एप्रिलला मिश्रौलिया पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली होती. खूप शोधल्यानंतर देखील मुलगी सापडली नसल्याने तिच्या वडिलांनी तीन जणांविरोधात सात एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. त्यात गुरुवारी उशीरा मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - Anand Rai arrested : व्यापम घोटाळा घडवून आणणारे व्हिसल ब्लोअर डॉ. आनंद राय यांना दिल्लीतून अट