नवी दिल्ली [भारत] : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोसह त्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी रवाना झाले. त्यांच्या विमानात तांत्रिक समस्या आल्यानं ते दिल्लीतच अडकून पडले होते. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रेस सचिव मोहम्मद हुसैन यांनी याला दुजोरा दिला. "विमानातील तांत्रिक समस्या सोडवण्यात आली आहे. विमान उड्डाणासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आज कॅनडाचे शिष्टमंडळ दुपारी रवाना झाले.
आज मायदेशी परतण्याची शक्यता : दिल्लीत नुकतीच G-20 परिषद पार पडली. त्यासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. G-20 शिखर परिषदेनंतर सर्वजण मायदेशी परतणार आहेत. पण, कॅनडाचे पंतप्रधान अजूनही भारतात अडकून पडले आहेत. त्याच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारतातच थांबावं लागलंय. ते रविवारी कॅनडात परतणार होते, मात्र त्यांच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांचं दिल्लीतलं वास्तव्य वाढलं. मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन ट्रूडोला नेण्यासाठी CC-150 पोलारिस विमान येणार आहे. हे अनेक सुधारित Airbus A310-300s पैकी एक आहे. कॅनडाच्या सशस्त्र दलांकडून पंतप्रधान, गव्हर्नर जनरल, इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी या विमानाचा वापर केला जातो. दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांसाठी आणखी एक विमान कॅनडाहून भारतासाठी रवाना झाल्याची बातमी आहे. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की जस्टिन ट्रूडो घेण्यासाठी पाठवलेले दुसरे विमान यूकेकडे वळवण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान कॅनडातील भारतविरोधी हालचालींचा मुद्दा जस्टिन ट्रूडो यांच्यासमोर उपस्थित केला होता. त्यावर ट्रुडो यांनी ते देशात द्वेष, हिंसाचार रोखण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. खलिस्तानींना कॅनडात आश्रय मिळाल्यानं भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, विमानात बिघाड झाल्यामुळे भारतात थांबावं लागलेल्या जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या मुलाबरोबर राहत वेळ सत्कारणी लावला.
हेही वाचा -
- Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : ज्योतिरादित्य सिंधियांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, संकुचित मानसिकतेमुळं...
- Nipah Alert In Kozhikode : केरळमध्ये निपाह विषाणूचा हाहाकार; दोन संशयित मृत्यू झाल्यानं आरोग्य विभागानं जारी केली 'अॅडव्हायझरी'
- Earthquake in Manipur : मणिपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू