दुबई आशिया कप 2022 Asia Cup 2022 च्या तयारीसाठी टीम इंडियाने गुरुवारी सराव सत्रात भाग घेतला. यादरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा Captain Rohit Sharma आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह उर्वरित खेळाडूंनी नेटमध्ये घाम गाळला Indian Cricket team practice session. आशिया चषक 2022 मध्ये, भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.
स्टार फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली Former captain Virat Kohli, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी नेट सत्रात अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारचा सामना केला. कोहली फिरकीपटूंच्या चेंडूंवर स्टेप्सचा वापर करून शॉट्स खेळताना दिसला, तर अर्शदीपच्या चेंडूंवर त्याने आपला क्लास दाखवला. रोहित फलंदाजीला आला तेव्हा सुरुवातीला त्याने काही चेंडू आरामात खेळले. त्याचवेळी सरावानंतर रोहित शर्मा मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसला. तो स्केटिंग स्कूटर चालवताना दिसला. रोहितचा हा व्हिडिओ Video of Rohit Sharma on Skating Scooter भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शेअर केला आहे.
-
🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 & @imVkohli get into the groove ahead of the first clash against Pakistan.#AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/GNd8imnmM3
— BCCI (@BCCI) August 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 & @imVkohli get into the groove ahead of the first clash against Pakistan.#AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/GNd8imnmM3
— BCCI (@BCCI) August 25, 2022🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 & @imVkohli get into the groove ahead of the first clash against Pakistan.#AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/GNd8imnmM3
— BCCI (@BCCI) August 25, 2022
आशिया चषक 2022 मध्ये, भारत 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध Ind vs Pak match आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. आशिया कप 2022 मध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा कर्णधार, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि अवेश खान.
हेही वाचा - BWF World Championships सात्विक चिराग जोडीने पुरुष दुहेरीत केले निश्चित भारताचे पहिले पदक