वेल्लोर (तामिळनाडू) - तामिळनाडूमध्ये पशुसंवर्धन सहाय्यक पदासाठी 6 एप्रिलपासून ( Interviews post of Veterinary Assistant ) मुलाखतीला सुरुवात झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पदव्युत्तर आणि अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारही ( tamil nadu Post graduates ) यामध्ये सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील विविध पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या ( job in Tamilnadu veterinary hospitals ) मुलाखती ११ एप्रिलपर्यंत सुरू राहिल्या आहेत.
वेल्लोर जिल्ह्यात, 2015 मध्ये पशुसंवर्धन सहाय्यकाच्या 22 पदांसाठी भरती सूचना जारी करण्यात ( Vellore district recruitment notice ) आली होती. या प्रकरणात न्यायालयीन प्रकरणामुळे मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. ही निवड प्रक्रिया कोरोना महामारीसह विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता तब्बल 7 वर्षांनंतर यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी पात्रता निश्चित करण्यात ( Veterinary Assistant eligibility ) आली होती. परंतु पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर आणि अभियांत्रिकी पदवीधरांसह सुमारे 5,000 लोकांनी नोकरीसाठी ( Exam Fever 2022 ) अर्ज केले. त्यापैकी काही आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर डेव्हलपरदेखील आहेत.
हे होते प्रात्याक्षिक- वेल्लोरच्या पशुवैद्यकीय सेवा सहायक संचालकांच्या कार्यालयात पशुसंवर्धन सेवा सहाय्यकाची मुलाखत सुरू झाली. 22 नोकऱ्यांसाठी 5,000 लोकांनी अर्ज केले. दररोज 800 जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मुलाखतीतील सहभागींसाठी प्रमाणपत्र पडताळणी ही पहिली पायरी होती. सायकल चालवणे, गाय बांधणे आणि गाय सांभाळणे या परीक्षा घेण्यात आल्या आहेत.
अर्ज करण्याचे हे दिले कारण- मुलाखतीसाठी आलेल्या पदव्युत्तर, पदवीधर उमेदवारांनी सांगितले की या नोकरीसाठी अर्ज करण्याची अनेक कारणे आहेत. ते म्हणाले की, बेरोजगारीच्या या युगात एक म्हणजे नोकरीची हमी आहे. दुसरे म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचे टार्गेट नाही. काहींनी सांगितले, की आपल्याच राज्यात नोकरी करणे सोपे आहे. नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही.
हेही वाचा-5 Workers Die : मासळी कारखान्यात विषारी वायू गळती, 5 कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक
हेही वाचा-Railway Jobs 2022 : रेल्वेत 147 गुड्स ट्रेन मॅनेजर, 2792 पदांसाठी विविध जागा, आजच अर्ज करा