चेन्नई Tamil Nadu Rains : तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. तामिळनाडूतील चार जिल्हे अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळं सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी या चार जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय. तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूर इथं पहाटे दीड वाजेपर्यंत अवघ्या 15 तासांत 60 सेंटीमीटर पाऊस झाला. तर तिरुनेलवेली जिल्ह्यातील पलायमकोट्टई इथं 26 सेमी पावसाची नोंद झाली आहे. कन्याकुमारीत 17.3 सेमी पाऊस झालाय.
-
#WATCH | Railway station at Thoothukudi inundated as heavy rainfall lashes the area#TamilNadu pic.twitter.com/dIqB8WYtev
— ANI (@ANI) December 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Railway station at Thoothukudi inundated as heavy rainfall lashes the area#TamilNadu pic.twitter.com/dIqB8WYtev
— ANI (@ANI) December 18, 2023#WATCH | Railway station at Thoothukudi inundated as heavy rainfall lashes the area#TamilNadu pic.twitter.com/dIqB8WYtev
— ANI (@ANI) December 18, 2023
आज सार्वजनिक सुट्टी जाहीर : मुसळधार पावसामुळं बाधित जिल्ह्यांमध्ये आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. या काळात शाळा, महाविद्यालये, बँका, खासगी आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या देखील बंद राहतील. केवळ मुसळधार पाऊसच नाही तर धरणातून सोडण्यात आलेलं पाणीही लोकांसाठी अडचणीचं ठरलंय. पापनासम, पेरुंजानी आणि पेचुपराई धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं आहे.
आजही मुसळधार पाऊस : मुसळधार पावसामुळं तेलंगणातील थामरापारणी नदीला पूर आलाय. त्यामुळंच धरणातील पाण्याचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. कोमोरिन परिसरात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. काही दिवसांपूर्वीच मिचॉन्ग चक्रीवादळ तामिळनाडूला धडकलं होतं. त्यामुळं राज्यात मोठं नुकसान झालं होतं.
प्रत्येक जिल्ह्यावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती : मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी अतिवृष्टीमुळं प्रभावित झालेल्या भागात मदत आणि बचाव कार्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी तैनात केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. स्टॅलिन यांनी जिल्हाधिकार्यांना संवेदनशील भागात मदत केंद्रे आणि बोटी तयार ठेवाव्यात आणि गरज पडल्यास लोकांना तातडीनं बाहेर काढण्याच्याही सूचना दिल्या आहेत. सखल भागातील लोकांना बाहेर काढण्याचं कामही सुरू आहे.
रेल्वे आणि विमान वाहतूक विस्कळीत : तामिळनाडू राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या चक्रीवादळातून राजधानी चेन्नई आणि आजूबाजूचे तीन जिल्हे अद्यापही सावरले आहेत. चक्रीवादळामुळं इथं पूर आला होता. आता सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं तुतीकोरीनला जाणारी उड्डाणं वळवण्यात आली आहेत तर काही रद्द करण्यात आली आहेत. तिरुनेलवेली इथून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनसह सतरा गाड्या अंशतः किंवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :