ETV Bharat / bharat

Assembly Election Results 2021 : केरळ, आसाममध्ये सत्ता कायम, तर तामिळनाडू, पुद्दुचेरीत सत्तांतर - आसाम विधानसभा निवडणूक निकाल

Tamil Nadu Kerala Puducherry Assam Assembly Election Results LIVE Updates
LIVE Updates : तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 2, 2021, 6:31 AM IST

Updated : May 2, 2021, 10:34 PM IST

22:31 May 02

आसाममध्ये भाजपमध्ये ७५ जागांवर विजयी

आसाममध्ये भाजप ७५ तर काँग्रेस ५० जागांवर विजयी. एक जागा अन्य पक्षाच्या खात्यात

22:30 May 02

पदुच्चेरीत भाजप १४ जागांवर विजयी

पदुच्चेरीत काँग्रेस सहा जागांवर विजयी. भाजप १४ जागांवर विजयी तर एका जागेवर आघाडीवर

22:30 May 02

तामिळनाडूत डीएमके १३६ जागांवर विजयी तर २३ जागांवर आघाडीवर

तामिळनाडूत एआयडीएमके ५६ जागांवर विजयी तर १९ जागांवर आघाडीवर. डीएमके १३६ जागांवर विजयी तर २३ जागांवर आघाडीवर.  

22:30 May 02

केरळमध्ये डावे ९९ जागांवर आघाडीवर

केरळमध्ये डावे ९९ जागांवर विजयी तर काँग्रेस आघाडी ४१ जागांवर आघाडीवर

18:52 May 02

आसाममध्ये भाजप ५७ जागांवर विजयी तर काँग्रेसची ३२ जागांवर सरशी

आसाममध्ये भाजप आघाडी ५७ जागांवर विजयी तर १५ जागांवर आघाडीवर, काँग्रेस व मित्रपक्ष ३२ जागांवर विजयी तर २१ जागांवर आघाडीवर

18:52 May 02

तामिळनाडूत डीएमके ६३ जागांवर विजयी तर ९३ जागांवर आघाडीवर

तामिळनाडूत डीएमके ६३ जागांवर विजयी तर ९३ जागांवर आघाडीवर. एआयडीएमके २१ जागांवर विजयी तर ५७ जागांवर आघाडीवर

18:51 May 02

केरळमध्ये डाव्यांनी गड राखला, ९४ जागांवर नोंदवला विजय

केरळमध्ये डावी आघाडी ९४ जागांवर विजयी तर ५ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस आघाडीला ४० जागांवर विजयी तर एका जागेवर आघाडीवर

15:02 May 02

डीएमके कार्यकर्ते व समर्थकांचा पक्ष कार्यलयाबाहेर जल्लोष

चेन्नई - डीएमकेचे कार्यकर्ते व समर्थकांकडून पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष. मात्र जल्लोष न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांची पांगापांग, 

14:28 May 02

केरळमधून एनडीएचा सुपडा साफ!

भाजपा उमेदवार 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन हे सध्या दोन हजार मतांनी पिछाडीवर आहेत. यानंतर केरळमध्ये एनडीएचे सर्व उमेदवार पिछाडीवर पडले आहेत.

सध्या राज्यात एलडीएफने ४० जागा जिंकल्या असून, यूडीएफने आठ जागांवर विजय मिळवला आहे. सध्या एलडीएफ ५७ ठिकाणी आघाडीवर असून, यूडीएफ ३५ ठिकाणी आघाडीवर आहे.

14:18 May 02

पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसीने खातं उघडलं..

पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेस आघाडीने एका जागेवर विजय मिळवला आहे. सध्या काँग्रेस आघाडी चार जागांवर, तर एआयएनआरसी ८ जागांवर पुढे आहे. पुद्दुचेरीमधील केवळ १७ जागांवरचे कल समोर आले आहेत. 

14:16 May 02

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने खातं उघडलं..

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने खातं उघडलं असून, एका जागेवर विजय मिळवला आहे. सध्या अण्णाद्रमुक ८६, तर द्रमुक १४६ जागांवर पुढे आहे. एमएनएम एका ठिकाणी आघाडीवर आहे.

14:15 May 02

आसाममध्ये काँग्रेस-भाजपाने खातं उघडलं..

आसाममध्ये काँग्रेस आघाडीने दोन जागांवर, तर भाजपा आघाडीने एका जागेवर विजय मिळवला आहे. सध्या भाजपा आघाडी ७४ जागांवर, तर काँग्रेस आघाडी ४६ जागांवर पुढे आहे. इतर पक्ष दोन ठिकाणी पुढे आहेत.

14:13 May 02

केरळमध्ये एलडीएफ २६ जागांवर विजयी..

केरळमध्ये एलडीएफ २६ जागांवर विजयी झाली आहे. तर यूडीएफ सात ठिकाणी विजयी झाली आहे. सध्या एलडीएफ ७३ जागांवर पुढे असून, यूडीएफ ३३ जागांवर पुढे आहे. तर, एनडीए केवळ एका ठिकाणी आघाडीवर आहे.

13:26 May 02

हा लोकांचा विजयन सरकारवरील विश्वास - प्रकाश कराट

एलडीएफचा होत असलेला विजय हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये एकाही सरकारला सलग दुसऱ्या टर्ममध्ये विजय मिळवता आला नव्हता. मात्र, पिनराई विजयन सरकारला लोक पुन्हा संधी देताना दिसून येत आहे. हा विजयन यांच्यावरील लोकांचा विश्वास आहे, असे मत सीपीआय(एम)चे नेते प्रकाश कराट यांनी व्यक्त केले आहे.

केरळमध्ये सध्या एलडीएफला १९ जागांवर विजय मिळाला असून, ७७ ठिकाणी ते आघाडीवर आहेत.

13:07 May 02

केरळ : एलडीएफ सोळा जागांवर विजयी..

केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ आतापर्यंत १६ जागांवर विजयी झाले आहे. तर, यूडीएफला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे. सध्या एलडीएफ ७८ जागांवर पुढे असून; यूडीएफ ४२, तर एनडीए दोन जागांवर पुढे आहे.

12:58 May 02

दुपारी एक वाजेपर्यंतचे कल समोर..

दुपारी एक वाजेपर्यंतचे प्रत्येक राज्यातील कल :

  • तामिळनाडूमध्ये डीएमके १३५, तर एआयडीएमके ९८ ठिकाणी पुढे आहे. यासोबतच एमएनएम एका ठिकाणी आघाडीवर आहे.
  • आसाममध्ये भाजपा ७९, काँग्रेस ४५, तर इतर दोन जागांवर पुढे आहेत.
  • केरळमध्ये एलडीएफ ११ जागांवर विजयी झाले आहे. तर, यूडीएफला एका जागेवर विजय मिळाला आहे. सध्या एलडीएफ ८४, यूडीएफ ४२ आणि एनडीए २ ठिकाणी पुढे आहे.
  • पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आघाडीला एक विजय मिळाला आहे. सध्या एआयएनआरसी ११, काँग्रेस ४ आणि इतर एका जागेवर पुढे आहे.

12:50 May 02

केरळ : एलडीएफ दहा जागांवर विजयी..

एलडीएफला आतापर्यंत दहा जागांवर विजय मिळाला आहे. तर, यूडीएफला एका जागेवर विजय मिळवता आला आहे. सध्या एलडीएफ ८५ जागांवर आघाडीवर असून; यूडीएफ ४२, तर एनडीए दोन जागांवर पुढे आहे.

12:23 May 02

केरळ : यूडीएफनेही खातं उघडलं..

यूडीएफनेही आपलं खातं उघडलं असून, एका जागेवर यूडीएफ उमेदवाराचा विजय झाला आहे. दरम्यान, एलडीएफचा पाच जागांवरील विजय निश्चित झाला असून, सध्या ९२ जागांवर एलडीएफ आघाडीवर आहे.

12:05 May 02

तामिळनाडू : स्टॅलिन बापलेक आघाडीवर..

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे कोलाथुर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर, त्यांचे पुत्र उदयानिधी स्टॅलिन चेपुक-तिरुवल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

11:57 May 02

केरळमधील पहिले निकाल समोर..

केरळमधील पहिले निकाल समोर आले असून, दोन जागांवर एलडीएफने विजय मिळवला आहे. सध्या एलडीएफ ८९ जागांवर पुढे असून, यूडीएफ ४४ जागांवर पुढे आहे. एनडीए अजूनही ३ ठिकाणी आघाडीवर आहे.

  • पेरंबलूर मतदारसंघातून पी. रामकृष्णन विजयी झाले आहेत.
  • उदुंबंचोला मतदारसंघात केवळ दोन फेऱ्या शिल्लक आहेत. याठिकाणी एम.एम. मणी मोठ्या फरकाने आघाडीवर असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

11:43 May 02

पुद्दुचेरीमधील पहिला निकास समोर; द्रमुकचा विजय..

पुद्दुचेरीमधील पहिला निकाल समोर आला आहे. द्रमुकचा एका जागेवर विजय झाला आहे. उप्पलम मतदारसंघात अनिबल केनेडी यांनी अण्णाद्रमुकच्या अनपालगना या उमेदवाराचा पराभव केला आहे. यानंतर काँग्रेस आघाडी आणखी तीन ठिकाणी पुढे आहे. तर, एआयएनआरसी १२ आणि इतर एका जागेवर पुढे आहे.

11:35 May 02

तामिळनाडू : मुख्यमंत्री पलानीसामी २४ हजार मतांनी आघाडीवर..

एडाप्पडी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पडी पलानीसामी यांच्याकडे सध्या २४,५६५ मतांची आघाडी आहे.

11:26 May 02

केरळ : मेट्रो मॅन, आणि मुख्यमंत्री विजयन आघाडीवर..

  • मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे ३,३०८ मतांनी आघाडीवर आहेत.
  • मुख्यमंत्री पिनराई विजयन हे ४,६५३ मतांनी आघाडीवर आहेत.

11:09 May 02

तामिळनाडू : कोईंबतूरमधून कमल हासन आघाडीवर..

कोईंबतूर दक्षिण मतदारसंघातून एमएनएमचे कमल हासन आघाडीवर आहेत. एमएनएमचे ते एकमेव उमेदवार आघाडीवर आहेत.

11:07 May 02

सकाळी अकरा वाजेपर्यंतचे कल समोर..

सकाळी अकरा वाजेपर्यंतचे प्रत्येक राज्यातील कल :

  • तामिळनाडूमध्ये डीएमके १३२, तर एआयडीएमके १०१ ठिकाणी पुढे आहे. यासोबतच एमएनएम एका ठिकाणी आघाडीवर आहे.
  • आसाममध्ये भाजपा ८१, काँग्रेस ४४, तर इतर एका जागेवर पुढे आहे.
  • केरळमध्ये एलडीएफ ८८, यूडीएफ ४९ आणि एनडीए ३ ठिकाणी पुढे आहे.
  • पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी १२, काँग्रेस ४ आणि इतर एका जागेवर पुढे आहे.

10:44 May 02

पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस पिछाडीवर..

पुद्दुचेरीमद्ये एआयएनआरसी १२ जागांवर पुढे आहे. तर, काँग्रेस चार ठिकाणी आघाडीवर आहे.

10:43 May 02

केरळमध्ये एलडीएफ ९० जागांवर पुढे..

केरळमध्ये एलडीएफ सध्या ९० ठिकाणी आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ यूडीएफ ४८, तर एनडीए दोन ठिकाणी आघाडीवर आहे.

10:42 May 02

तामिळनाडू : सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुकने गाठला बहुमताचा आकडा..

तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुकने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. याठिकाणी द्रमुक १३४, अण्णाद्रमुक ९९, तर एमएनएम एका जागेवर पुढे आहे.

10:34 May 02

आसाममधील सर्व जागांचे कल समोर; भाजपा आघाडीवर..

आसाममधील सर्व जागांचे कल समोर आले आहेत. भाजपा सध्या ८२ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेस ४२ ठिकाणी आघाडीवर असून, एजेपी आणि इतर प्रत्येकी एका ठिकाणी पुढे आहेत.

10:25 May 02

केरळमध्ये 'मेट्रो मॅन' आघाडीवर..

पलक्कड मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन हे सध्या आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी आहे.

10:20 May 02

तामिळनाडूमधील सर्व जागांचे कल समोर; द्रमुककडे मोठी आघाडी..

तामिळनाडूमधील सर्व जागांवरचे कल समोर आले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार द्रमुक १३५ ठिकाणी आघाडीवर आहे. अण्णाद्रमुक ९८ ठिकाणी पुढे आहे, तर एमएनएम एका ठिकाणी आघाडीवर आहे.

10:06 May 02

सकाळी दहा वाजेपर्यंतचे कल समोर..

सकाळी दहा वाजेपर्यंतचे प्रत्येक राज्यातील कल :

  • तामिळनाडूमध्ये डीएमके १२४, तर एआयडीएमके ८४ ठिकाणी पुढे आहे. यासोबतच एमएनएम, एएमएमके आणि इतर प्रत्येकी एका ठिकाणी आघाडीवर आहेत.
  • आसाममध्ये भाजपा ६९, काँग्रेस ३६, तर एजेपी आणि इतर प्रत्येकी एका जागेवर पुढे आहे.
  • केरळमध्ये एलडीएफ ८७, यूडीएफ ५० आणि एनडीए ३ ठिकाणी पुढे आहे.
  • पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी १२, तर काँग्रेस ५ जागांवर पुढे आहे.

09:42 May 02

आसाममध्ये भाजपा ५० ठिकाणी आघाडीवर..

आसाममध्ये भाजपा ५० जागांवर पुढे आहे. आतापर्यंत एकूण ७८ जागांवरचे कल हाती आले आहेत. भाजपापाठोपाठ काँग्रेस २५, एजेपी एका, तर इतर दोन जागांवर पुढे आहेत.

09:28 May 02

केरळमधील सर्व जागांचे कल समोर..

केरळमधील सर्व जागांचे कल समोर आले आहेत. सध्या १४० पैकी ७९ जागांवर एलडीएफ, तर ५९ जागांवर यूडीएफ पुढे आहे. दरम्यान, एनडीए केवळ दोन ठिकाणी पुढे असल्याचे दिसून येत आहे.

09:18 May 02

तामिळनाडूतील १०० जागांचे कल समोर; चुरशीची लढाई

तामिळनाडूमधील १०३ जागांचे कल समोर आले असून, द्रमुक आणि अण्णाद्रमुकमध्ये चुरशीची लढाई पहायला मिळत आहे. द्रमुक ५९, अण्णाद्रमुक ३९, एएमएमके ३, तर एमएनएम आणि इतर प्रत्येकी एका जागेवर पुढे आहेत. 

09:05 May 02

सकाळी नऊ वाजेपर्यंतचे कल समोर..

सकाळी नऊ वाजेपर्यंतचे प्रत्येक राज्यातील कल :

  • तामिळनाडूमध्ये डीएमके ४५, तर एआयडीएमके २८ ठिकाणी पुढे आहे.
  • आसाममध्ये भाजपा ३१, काँग्रेस १४, तर एजेपी एका जागेवर पुढे आहे.
  • केरळमध्ये एलडीएफ ७२, यूडीएफ ५० आणि एनडीए ३ ठिकाणी पुढे आहे.
  • पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी ८, तर काँग्रेस २ जागांवर पुढे आहे.

08:57 May 02

आसामच्या ४० जागांवरील कल समोर..

आसामच्या ४२ जागांवरील कल समोर आले आहेत. यांपैकी भाजपा २९, तर काँग्रेस १२ आणि इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.

08:49 May 02

तामिळनाडूमधील ५० जागांवरील कल समोर..

तामिळनाडूच्या ५६ जागांवरील कल समोर आले आहेत. याठिकाणी डीएमके ३०, तर एडीएमके २६ जागांवर पुढे आहे.

08:44 May 02

आसाममधील ३० जागांचे कल समोर..

आसाममधील ३४ जागांवरील कल समोर आले आहेत. यांपैकी २२ जागांवर भाजपा, १२ जागांवर काँग्रेस, तर एका ठिकाणी इतर आघाडीवर आहेत.

08:43 May 02

तामिळनाडूमधील ३० जागांचे कल समोर..

तामिळनाडूमधील ३० जागांचे कल समोर आले असून; डीएमके २० तर एआयडीएमके १० जागांवर पुढे आहे. दरम्यान, पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी पाच जागांवर पुढे आहे.

08:40 May 02

केरळमधील १०० जागांवरील कल समोर..

केरळमधील १०० मतदारसंघांतील कल समोर आले असून; एलडीएफ ५१, यूडीएफ ४५ आणि एनडीए तीन ठिकाणी आघाडीवर आहे.

08:30 May 02

सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचे कल..

सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचे प्रत्येक राज्यातील कल :

  • तामिळनाडूमध्ये डीएमके ९, तर एआयडीएमके २ ठिकाणी पुढे आहे.
  • आसाममध्ये भाजपा १५, तर काँग्रेस ८ जागांवर पुढे आहे.
  • केरळमध्ये एलडीएफ ३३, यूडीएफ ४० आणि एनडीए २ ठिकाणी पुढे आहे.
  • पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी ४ जागांवर पुढे आहे.

08:22 May 02

आसाममध्ये भाजपा आघाडीवर..

आसामचे पहिले कल हाती आले असून, भाजपा १४ तर काँग्रेस केवळ तीन ठिकाणी आघाडीवर आहे.

08:21 May 02

तामिळनाडूमधील पहिले कल हाती; डीएमके तीन जागांवर आघाडीवर..

तामिळनाडूमधील पहिले कल हाती आले असून, स्टॅलिन यांची डीएमके तीन ठिकाणी आघाडीवर दिसून येत आहे.

08:19 May 02

केरळमधील पहिले कल हाती; एलडीएफ दहा ठिकाणी आघाडीवर..

केरळमधील पहिले कल हाती आले आहेत. एलडीएफ दहा जागांवर, तर यूडीएफ पाच जागांवर आघाडीवर आहे.

08:01 May 02

मतमोजणीला सुरुवात..

तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही वेळातच पहिले कल हाती येणार आहेत.

06:47 May 02

केरळमध्ये डावी आघाडी पुन्हा जिकण्याचा अंदाज..

डव्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या केरळ राज्यात यंदा कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यात १४० विधानसभा जागांवर निवणडूक लढवली गेली. ईटीव्ही भारतच्या पोस्ट पोल अंदाजानुसार, सीपीआय (एम) प्रणित डावे लोकशाही (एलडीएफ) आघाडीला निवडणुकीत यश मिळण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास सरकार विरोधी लाट राज्यात नसल्याचे स्पष्ट होईल. यंदा एलडीएफला ११ जागांचे नुसकान होणार असल्याचा अंदाज आहे. असे झाल्यास एलडीएफच्या जिंकून आलेल्या जागांची संख्या ९३ वरून ८२ वर घसरेल. तरी देखील एलडीएफचा बहुमताने विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

06:46 May 02

तामिळनाडूमध्ये डीएमके सत्ता स्थापन करण्याची शक्यता..

तामिळनाडूत द्रमुख मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि अखिल भारतील अन्ना द्रमुख मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्यात थेट लढत आहे. ईटीव्ही भारतच्या एक्झिट पोलनुसार राज्यात डीएमके आघाडीला १३३ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर एआयएडीएमके आघाडीला फक्त ८९ जागा आणि इतरांना १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. निकालाच्या या अंदाजातून पलानीस्वामी यांचा स्पष्ट पराभव होताना दिसत आहे, तर २०१६ मध्ये फार कमी फरकाने निवडणूक हरलेला डीएमके पक्ष हा मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असलेल्या एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वात राज्यात सत्ता स्थापन करताना दिसून येत आहे.

06:45 May 02

आसाममध्ये भाजपा सत्तेत येण्याची शक्यता; ईटीव्ही भारतचा अंदाज..

आसाममध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक झाली. येथे भाजप आणि संयुक्त पुरोगामी आघाडीत थेट लढत होती. पुरोगामी आघाडीत ७ इतर पक्ष आहेत. ईटीव्ही भारतने या राज्यातील निकालाचा लक्षवेधक अंदाज नमुद केला आहे. यानुसार भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२६ पैकी जवळपास ६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला ५५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर, नव्याने अस्तित्वात आलेल्या व शेतकरी हक्क कार्यकर्ता अखिल गोगोई यांच्या नेतृत्वातील असोम जातीय परिषद (एजेपी) आणि रायजोर दल यांच्यासह इतरांना ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

06:38 May 02

कोणत्या राज्यात काय आहे जादुई आकडा?

  • तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी मतदान पार पडले. याठिकाणी ११८ हा जादूई आकडा आहे.
  • पुदुच्चेरीमध्ये 30 विधानसभा मतदारसंघावर मतदान पार पडले. याठिकाणी १६ हा जादूई आकडा आहे.
  • १४० जागांच्या केरळ विधानसभेसाठी ७२ हा जादूई आकडा आहे.
  • आसामच्या १२६ विधानसभा मतदारसंघावर मतदान पार पडले. याठिकाणी सत्तेसाठी ६४ जागांची गरज आहे.

06:21 May 02

तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

हैदराबाद : तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही तीन राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे. सहा एप्रिलला तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमधील मतदान पार पडले होते. तर, आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. या सर्व निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Last Updated : May 2, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.