कन्नूर - केरळच्या कन्नूरमधील गोड तुळशीचे रोपटे ( Sweet Basil Alternative to Sugar ) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या वनस्पतीचे एक पान हे साखरेपेक्षा 30 पट जास्त गोड असल्याचे म्हटलं जात आहे. यातील खास बाब म्हणजे, मधूमेह ( Tulsi Leaves For Diabetes ) असलेले रुग्णदेखील याचे सेवन करू शकतात. कन्नूरमधील परियाराम येथील रहिवासी के व्ही शाजी हे या वनस्पतीची शेती करत आहेत. या वनस्पतीला मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
गोड तुळस (मल्याळममध्ये मधुरा तुलसी) मध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि रक्तदाब कमी करण्याचे गुण आहेत. के व्ही शाजी यांनी या तुळशीचे रोपे त्रिवेंद्रम येथून आणली. या तुळशीला तीन महिन्यात फुले येतात. फुले आल्यानंतर झाडाच्या फांद्या काढल्या जातात. या फांद्याची पाने वाळण्यात येतात आणि त्यापासून पावडर बनवण्यात येते. ही पावडर ५ ते ७ मिनिटे उकळली की पाण्यात गोडवा मिसळतो. या तुळशीचे तीन रोपटे 250 रुपयांना के व्ही शाजी विकतात. ही वनस्पती सुमारे पाच वर्ष उत्पन्न देत असल्याचे के व्ही शाजी यांनी सांगितले.
हेही वाचा - Wrestler Shot Dead in Pune : चाकणमध्ये पैलवानाचा गोळ्या झाडून खून