ETV Bharat / bharat

सुवेंदू अधिकारी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - नंदीग्राम मतदारसंघ

भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होत आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

author img

By

Published : Mar 12, 2021, 1:35 PM IST

कोलकाता - भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अधिकारी यांनी नंदीग्राममधील मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधीत केले. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. राज्यात बदल गरजेचा असून आपल्याला तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हकलून लावायचे आहे, असे ते म्हणाले.

मला जनतेने आशिर्वाद दिला आहे. भाजपाला बंगालवासी समर्थन देतील आणि राज्यात बदल घडवतील, असा विश्वास आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा बहूमताने सरकार स्थापन करेल, असेही ते म्हणाले.

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूल काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री असलेले अधिकारी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपामध्ये दाखल होते. 10 मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बॅनर्जी आतापर्यंत भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना -

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. अमित शहा यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेतलं आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.

हेही वाचा - ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून करणार प्रचार; रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.