श्रीनगर : भारतीय सीमा रेषेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयित महिलेचा लष्करी जवानांनी खात्मा केला आहे. जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला वारंवार बजावल्यानंतरही या महिलेने सीमेरेषेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जवानांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा खात्मा झाला. ही घटना बारामुल्ला सेक्टरमधील कमलकोट नियंत्रण रेषेवर सोमवारी घडल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.
कमलकोट नियंत्रण रेषा ओलाडण्याचा प्रयत्न : सोमवारी भारतीय लष्करी जवान सीमारेषेवर गस्त घालत होते. यावेळी कमलकोट नियंत्रण रेषेवर पाकव्याप्त काश्मीरकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करताना महिला दिसून आली. यावेळी भारतीय जवानांनी या महिलेला इशारा देऊन थांबण्यास सांगितले. मात्र या महिलेने भारतीय जवानांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत भारतीय सीमारेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जवानांनी गोळीबार केला.
संशयित महिलेचा पळत जाऊन लपण्याचा प्रयत्न : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधून ही महिला भारतीय हद्दीत प्रवेश करत होती. जवानांनी कमलकोट भागातील नियंत्रण रेषा ओलांडून सीमेवरील कुंपणाजवळ येत असलेल्या या महिलेला इशारा देत थांबण्याच्या सूचना दिल्या. मात्र लष्करी जवानांनी आवाज दिल्यानंतरही या महिलेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सुरक्षा दलाच्या जवानांनी तिला वारंवार थांबण्याचा इशारा दिला. मात्र ही महिला संशयितपणे पळत राहिली. त्यानंतर या महिलेने लपण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय लष्करी जवानांना गोळीबार करावा लागला. गोळी लागल्याने महिलेचा या महिलेचा मृत्यू झाला.
जवानांनी घेतला मृतदेह ताब्यात : पाकव्याप्त काश्मीरमधून नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर जवानांनी या महिलेचा खात्मा केला. त्यानंतर जवानांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी सुरक्षा दल आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत आहेत.
दहशतवादी संघटना आखतात कट : नागरिक अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमधून सीमा ओलांडतात. अशावेळी सुरक्षा दल प्रथम त्यांना थांबण्यास सांगत असल्याचेही जवानांनी यावेळी सांगितले. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार त्यांची चौकशी केली जाते. काहीही संशयास्पद आढळले नाही तर त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात दिले जाते. पण अनेक वेळा पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या सीमेच्या या मार्गाचा वापर करून सीमेपलीकडून दहशतवादी पाठवतात. अशा परिस्थितीत प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करते. भारतीय लष्करी जवानांनी आरडाओरड केल्यावरही घुसखोरांनी प्रतिसाद दिला नाही तर जवानांना सीमेचे रक्षण करण्यासाठी गोळीबार करावा लागतो.
हेही वाचा -
- People Killed In Open Fired : मेक्सिकोत माथेफिरुचा नागरिकांवर अंदाधूंद गोळीबार, तीन नागरिकांचा बळी; दोन अधिकाऱ्यांसह नागरिक जखमी
- KTR Laid foundation for Foxconn: केटीआर यांनी रंगारेड्डी जिल्ह्यात फॉक्सकॉन उद्योगाची केली पायाभरणी
- Mamata Banerjee On Congress : काँग्रेसला कर्नाटकात मदत करू, त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये - ममता बॅनर्जी