ETV Bharat / bharat

Bail to Sushil Kumar: सुशील कुमारला ४ दिवसांचा अंतरिम जामीन, वडिलांच्या अंत्यविधीला राहणार हजर - ऑलिम्पियन कुस्तीपटू सुशील कुमार

ऑलिम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली न्यायालयाने सोमवारी चार दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे तो वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहे.

Bail to Sushil Kumar
सुशील कुमारला ४ दिवसांचा अंतरिम जामीन
author img

By

Published : Mar 7, 2023, 8:47 AM IST

नवी दिल्ली: ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी ऑलिम्पियन कुस्तीपटू सुशील कुमार याला त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने सोमवारी चार दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना मानवतेच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे. सुशील कुमार 2 जून 2021 पासून तुरुंगात आहे. 4 मे 2021 रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सोनीपत येथील रहिवासी असलेल्या कुस्तीपटू सागर धनखरला काही लोकांनी बेदम मारहाण केली होती.

सागर धनखर यांच्या हत्येचा आरोप : ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुशील कुमारवर यांच्यावर या खुनाचा आरोप आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला असता दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू सुशील कुमारला त्याच्या साथीदारांसह पकडले. सुशील कुमारवर दिल्ली न्यायालयाने खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर कृत्ये आणि इतर गुन्हेगारी खटल्यांखाली खटला चालवला आहे. आरोप निश्चित केले आहेत. सुशील कुमारसह इतर १७ ज्युनियर कुस्तीपटूंचाही यामध्ये समावेश आहे. या सर्वांवर सागर धनखर यांच्या हत्येचा आरोप आहे.

हत्येचे कारण : वास्तविक प्रकरण सागर धनखर आणि सुशील पहेलवान यांच्यात फ्लॅट रिकामे करण्यावरून वाद झाला होता. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर सागर आणि त्याच्या दोन साथीदारांना हे प्रकरण मिटवण्यासाठी बळजबरीने छत्रसाल स्टेडियमवर आणण्यात आले, तिथे सुशील आधीच त्याच्या साथीदारांसह उपस्थित होता. येथेच सुशील व त्याच्या साथीदारांनी सागर व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली होती.

सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना अटक : या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी यानंतर अथक परिश्रमानंतर कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली होती. या प्रकरणाची सध्या दिल्लीतील रोहिणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 18 आरोपी यामध्ये तुरुंगात आहेत. अन्य दोघे आरोपी फरार आहेत. या अन्य दोन फरार आरोपींवर न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.

हेही वाचा : Sania Mirza Last Match : सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा! जिथून कारकिर्दीला सुरुवात केली तेथेच खेळला अखेरचा सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.