ETV Bharat / bharat

Survey of Gyanvapi Mosque Complex : ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण अन् व्हिडिओग्राफीचे काम आजपासून - ज्ञानवापी मशीद संकुलाचे आज सर्वेक्षण

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलाची व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणाचे काम आज केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे काम सुरू आहे. ( Survey of Gyanvapi ) आज दुपारी ३ वाजल्यापासून ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Survey of Gyanvapi Mosque Complex
Survey of Gyanvapi Mosque Complex
author img

By

Published : May 6, 2022, 12:52 PM IST

वाराणसी ( उत्तर प्रदेश) - वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलाची व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणाचे काम आज केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे काम सुरू आहे. ( Survey of Gyanvapi Mosque Complex ) आज दुपारी ३ वाजल्यापासून ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मशिदीच्या दोन्ही तळघरांचेही सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यापैकी एका तळघराची चावी प्रशासनाकडे तर दुसऱ्या तळघराची चावी मशिदीच्या प्रशासनाकडे आहे. या संपूर्ण सर्वेक्षणासाठी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीही होणार आहे.

प्रत्यक्षात रेखा पाठक, सीता साहू, लक्ष्मी देवी आणि मंजू व्यास आणि राखी सिंह या पाच महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाच याचिकाकर्त्या महिलांनी शृंगार गौरी मंदिरात दैनंदिन पूजा करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयात केली होती. ज्ञानवापी मशीद संकुलात शृंगार गौरीचे मंदिर असून मशिदीच्या भिंतीला लागूनत हे मंदिर असल्याने न्यायालयाच्या परवानगीची गरज निर्माण झाली होती.

18 ऑगस्ट रोजी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वाराणसी दिवाणी न्यायालयाचा आदेश २६ एप्रिल रोजी आला. आदेशात एक आयोग नेमण्यात आला असून या आयोगाला 6 व 7 मे रोजी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत शृंगार गौरीचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ( Survey of Gyanvapi Mosque Complex In Varanasi ) 10 मे पर्यंत न्यायालयाने संपूर्ण माहिती मागवली आहे. मंदिर पाडूनच मशीद बांधली आहे, असा हिंदू बाजूचा युक्तिवाद आहे. त्यामुळे त्यांना शृंगार गौरी मंदिरात पूजा करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी आहे.

ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणाबाबत वाद होण्याची शक्यता असल्याने याचिकाकर्ते धास्तावले आहेत. आज दुपारपासून सुरू झालेल्या व्हिडीओग्राफीवरून तणाव निर्माण झाला आहे. येथे शृंगार गौरी मंदिरात पूजेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे गाठले. व्हिडिओग्राफीसाठी नेमलेल्या आयुक्तांनीही सुरक्षेची मागणी केली असून, न्यायालयाने पोलिस आयुक्तांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - Terrorists Nanded Connection : दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी नांदेडचे पोलीस हरियाणाला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.