ETV Bharat / bharat

Suspended MLA Case : भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालं 'असं' काही - पीठासीन अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन

पीठासीन अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे ( 12 BJP MLA ) विधानसभेतून एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली ( Suspended MLA Case )होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला ( Supreme Court Reserved Order Of Suspended BJP MLA ) आहे.

निलंबित आमदार
निलंबित आमदार
author img

By

Published : Jan 19, 2022, 3:05 PM IST

Updated : Jan 19, 2022, 10:09 PM IST

नवी दिल्ली - विधानसभेत पीठासन अधिकारी भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांच्यासमोर हुज्जत घालणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना ( 12 BJP MLA ) मागील पावसाळी अधिवेशनात निलंबित ( Suspended MLA ) करण्यात आलं होत. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने आदेश राखून ठेवल्याने ( Supreme Court Reserved Order Of Suspended BJP MLA ) या १२ आमदारांची धाकधूक वाढली आहे.

भाजप नेते आशिष शेलार

न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आणि त्यांना लेखी म्हणणे दाखल करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, विधानसभेतून एका वर्षासाठी निलंबन करण्यामागे काही कारण आहे. विधानसभा सदस्याला पुढील अधिवेशनात उपस्थित राहण्याची परवानगी न देण्यामागे काहीतरी मोठे कारण असावे.

यापूर्वी, खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले होते की, महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याचा जो ठराव मंजूर केला आहे, तो प्रथमदर्शनी असंवैधानिक आहे. कारण असे निलंबन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालू शकत नाही. त्यात असेही म्हटले होते की, एखाद्या आमदाराला त्याच्या जागेवर अनुपस्थित राहण्याची राज्यघटनेनुसार स्पष्ट बाह्य मर्यादा ६० दिवसांची आहे. किती वेळ जागा रिक्त राहू शकते? जास्तीत जास्त सहा महिने, सभागृहाच्या बाहेर राहण्याची मर्यादा असू शकते. येथे आपण लोकशाहीच्या संसदीय स्वरूपातील मतदारसंघाबद्दल बोलत आहोत? हे संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का देत नाही का? मतदारसंघात प्रतिनिधित्व नाही? असेही खंडपीठाने विचारले होते.

पावसाळी अधिवेशनात काय झाले होते?

राज्याच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यांनतर सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमनेसामने देखील आले. तर, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. यामध्ये आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar), आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute), आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar), आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute), आमदार योगेश सागर (MLA Yogesh Sagar), आमदार किर्तीकुमार बागडिया (MLA Kirti Kumar Bagdia), आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan), आमदार जयकुमार रावल (MLA Jaykumar Rawal), आमदार अभिमन्यू पवार (MLA Abhimanyu Pawar), आमदार पराग अळवणी (MLA Parag Alvani), आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche), आमदार हरीश पिंपळे (MLA Harish Pimple) या आमदारांचा समावेश होता. या सर्व निलंबन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही याचिका निकाली काढल्याने यांचे निलंबन कायम राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातूनच आम्हाला न्याय भेटेल- शेलार

आज न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला असला तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून, आम्हाला तिथे न्याय नक्की भेटेल असा आशावाद निलंबित आमदार भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Jan 19, 2022, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.