दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. या दरम्यान न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रमुखालाच पोलिसांवर विश्वास नाही, हे चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया न्यायालयाने दिली आहे.
हेही वाचा - UP Assembly Election : बसपा प्रमुख मायावती आणि सतीश चंद्र मिश्रा यांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर बातमी
आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने सदर चिंता व्यक्त केली. आम्ही तुम्हाला आवश्यक तेवढी सुरक्षा दिली आहे, आता अजून सुरक्षा तुम्हाला देणार नाही, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती एस.के कौल आणि न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाणे दिली.
काय आहेत परमबीर सिंग यांचे आरोप?
परमबीर सिंग यांचा आरोप आहे की, त्यांना लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे त्यांचा तपास प्रभावित केला जात आहे. त्यामुळे, त्यांचे प्रकरण ट्रान्सफर केले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे सीबीआईचे निदेशक हे अनिल देशमुख प्रकरणात साक्षिदार आहेत, त्यामुळे सीबीआईने या प्रकरणाचा तपास करू नये, अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे.
न्यायालय म्हणाले
जर संस्था एकमेकांविरुद्ध अशा शंका व्यक्त करू लागल्या तर, आम्ही काय करू शकणार? हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. राज्य सरकारनेही पावले उचलावीत. ते तपासाला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम आहेत की नाही, हे आपल्याला बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती कौल यांनी दिली.
न्यायालयाने परमबीर सिंग यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले व त्यांची सुरक्षा वाढवली. त्याचबरोबर, महाराष्ट्र सरकारकडून तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रही मागितले आहे.
हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद