ETV Bharat / bharat

SC Notice To Election Commission: पक्षांच्या नावात धार्मिक शब्द वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

राजकीय पक्षांच्या नावावर धार्मिक नावे आणि चिन्हे वापरणाऱ्या राजकीय पक्षांविरोधातील याचिकेवर (SC Notice To Election Commission) सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

सुप्रिम कोर्ट
सुप्रिम कोर्ट
author img

By

Published : Sep 5, 2022, 1:45 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवार (दि. 5 सप्टेंबर)रोजी भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षांकडून धार्मिक नावे आणि चिन्हांच्या वापराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. (Supreme Court notice to Election Commission) धार्मिक नावे आणि चिन्हे वापरणाऱ्या राजकीय पक्षांवर आक्षेप घेण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांच्या चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवावा - याचिकाकर्ते सय्यद वसीम रिझवी यांनी म्हटले आहे की, न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. त्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्यातर्फे वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगितले की, राजकीय पक्षांच्या चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवावा.

धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर - राजकीय पक्षांकडून धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षेप घेण्यात आला होता. वसीम रिझवी यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. जर धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल, तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही, असे मत याचिकाकर्ते रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे.

वकील गौरव भाटिया - न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगितले की, राजकीय पक्षांच्या भांडणात चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवाला पाहिजे.

हेही वाचा - Cyrus Mistry funeral : सायरस मिस्त्रींवर मंगळवारी वरळीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.