ETV Bharat / bharat

धक्कादायक, वीज कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीला शेणाच्या ढिगाऱ्यात पुरले

छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात वीज कोसळून गंभीर भाजलेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबण्यात आले. प्रयत्न करूनही जेव्हा त्या तरूणाची प्रकृती ठीक झाली नाही, तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्या युवकाचा मृत्यू झाला.

dung
dung
author img

By

Published : May 19, 2021, 4:39 PM IST

सरगुजा - आजही अंधश्रद्धेची मुळे समाजमध्ये खूप खोलवर आहेत. आजही बर्‍याच भागांमध्ये लहान-मोठ्या आजारांवर अनागोंदी आणि बेशिस्तपणे उपचार केला जातो. ज्यामध्ये बहुतेक लोक आपला जीव गमावतात. अशीच एक घटना छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. वीज कोसळून गंभीर भाजलेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबण्यात आले. प्रयत्न करूनही जेव्हा त्या तरूणाची प्रकृती ठीक झाली नाही, तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्या युवकाचा मृत्यू झाला.

लखनपूर ब्लॉक अंतर्गत ग्रामपंचायत मुटकी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास 35 वर्षीय किशून राम राजावाडा या व्यक्तीवर वीज पडली. जखमी झालेल्या किशूनला कुटुंबीयांनी शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबले. मात्र, त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या मदतीने त्याला उदयपूर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जर त्याला वेळीच रुग्णालयात नेले असते. तर कदाचित डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याचा जीव वाचू शकला असता.

अंधविश्वासामुळे गेला बळी -

वीज कोसळली तेव्हा मृताची पत्नी आपल्या दोन मुलांसह घराच्या आत होती. अंगणात पाणी बाहेर काढण्यासाठी किशून नाल्याची साफसफाई करीत होता. यात अचानक त्याच्यावर वीज कोसळली. हे पाहून कुटुंबीयांनी आरडा-ओरडा केला. यावेळी गावातील काही लोकांनी त्याला उपचारासाठी शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरले. गावकऱ्यांच्या अंधविश्वासामुळे त्याचा बळी गेला. यापूर्वी छत्तीसगढमध्ये आशा घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल पुन्हा 21 मे पर्यंत तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.