मुंबई - राज्यात रोज उन्हाचा पारा वाढत आहे. मुंबईसह नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, धुळे, या शहरांतही मोठी उष्णता वाढली आहे. तसेच, औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद या जिल्ह्यांतही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तर, मुंबई, कोकण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इकडेही चांगलेच ऊन तापले आहे.
आज ढगाळ वातावरण जाणवेल - आज (25 एप्रिल)रोजी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण जणवेल. तसेच, येत्या पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्हा आणि रायगड येथील भागामध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पाऊस पडू शकतो. सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार या दरम्यान पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
'या' ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा - अकोला आणि बुलडाणा येथे मंगळवारी ते गुरूवारी या काळात उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो. तसेच, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्णता वाढू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
- विदर्भातील हवामान अंदाज

- मराठवाड्यातील हवामान अंदाज

- मुंबई कोकण विभागातील हवामान अंदाज

हेही वाचा - Today Petrol- Diesel Rates : इंधनाची झळ! पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले; वाचा आजचे दर