ETV Bharat / bharat

सुकमात मोठा नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचा जवान हुतात्मा, मुख्यमंत्री विष्णुदेव साईंनी व्यक्त केला शोक - एसआय सुधाकर रेड्डी

Sukma Naxal Attack : सुकमाच्या बेद्रे कॅम्पवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केलाय. नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेवर निघालेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केलाय. हल्ल्यादरम्यान झालेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला तर दुसरा जखमी झालाय. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही हुतात्मा एसआय सुधाकर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Sukma Naxal Attack
Sukma Naxal Attack
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 12:51 PM IST

सुकमा (छत्तीसगड) Sukma Naxal Attack : सुकमाच्या जगरगुंडा येथील बेद्रे कॅम्पजवळ शोधासाठी निघालेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केलाय. या हल्ल्यात सीआरपीएफ 165 व्या बटालियनचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हुतात्मा झाले. तसंच कॉन्स्टेबल रामू यांना गोळी लागल्यानं ते जखमी झाले. जखमी जवानाला प्राथमिक उपचार करून हेलिकॉप्टरनं एअरलिफ्ट करण्यात आलंय.

नक्षलवाद्यांनी बेद्रे कॅम्पवर केला गोळीबार : आज सकाळी 7 वाजता सीआरपीएफ 165 व्या बटालियनची एक कंपनी जगरगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेद्रे कॅम्प इथून शोध मोहिमेवर निघाली होती. उर्संगलकडं जात असताना नक्षलवाद्यांनी या जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हुतात्मा झाले. याशिवाय एक हवालदार रामू यांना गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी जवानाला प्राथमिक उपचारासाठी हेलिकॉप्टरनं हलवण्यात आलंय.

  • सैनिकांकडून परिसरात कसून शोध सुरु : हल्ल्यानंतरच्या झडतीदरम्यान जवानांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलंय. यानंतर सुरक्षा दल आजूबाजूच्या भागात सखोल शोधमोहीम राबवत आहेत. शोध मोहिमेत सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाचे जवान सहभागी आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली हुतात्मांना श्रद्धांजली : सुकमा येथील चकमकीत हुतात्मा झालेले उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी यांच्या हौतात्म्याला मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या घटनेत जखमी झालेल्या जवान रामूवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. रामूला उपचारासाठी हेलिकॉप्टरनं एअरलिफ्ट करण्यात आलंय. हुतात्मा आणि जखमी जवान सीआरपीएफ 165 व्या बटालियनचे आहेत.

हेही वाचा :

  1. Two Soldiers Martyred : नक्षल्यांबरोबरील चकमकीत झारखंडमध्ये दोन जवानांना वीरमरण, स्वातंत्र्य दिनीच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
  2. Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, महाराष्ट्र सीमेवर दोन जवान शहीद
  3. Dantewada Naxalite Attack Video: दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर, 10 जवान झाले शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.