जयपूर Rajasthan Bandh : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजपूत समाजानं आज 'राजस्थान बंद'ची हाक दिलीय. हल्लेखोरांना अटक करण्यात यावं, या मागणीसाठी मेट्रो हॉस्पिटलसमोर संपावर बसलेल्या राजपूत समाजाच्या नेत्यांनी 'राजस्थान बंद'ची घोषणा केलीय. अशा परिस्थितीत जयपूर व्यापारी मंडळानं सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यापाऱ्यांना दुकानं आणि विविध आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन केलंय. तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन बंदच्या समर्थनार्थ शाळा बंद ठेवण्याचं आवाहनही केलंय.
उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी : जयपूरमध्ये दिवसाढवळ्या सुखदेव सिंग गोगामेडीच्या हत्येनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पुर्वीचं ट्विटर) वर लॉरेन्स बिश्नोई, जयपूर आणि राजस्थान बंद, सुखदेवसिंह गोगामेडी हे ट्रेंडींग होत आहे. राजपूत समाजाच्या विविध संघटनांनी गोगामेडी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करत तातडीनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. राजपूत सभेचे अध्यक्ष रामसिंग चांदलाई यांनी या घटनेला दुःखद म्हणत सर्व समाजाकडून जयपूर बंदची हाक दिलीय. चांदलाई म्हणाले, बंदबाबत व्यापारी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही झालीय. तसंच पोलिसांऐवजी या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी. कुटुंबाची सुरक्षा आणि साक्षीदाराला भक्कम संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आलीय. यासोबतच समाजाच्या इतर मागण्यांचा विचार केला जात आहे.
"सुखदेव सिंग यांचं जीवन समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी समर्पित आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांना तत्काळ अटक करुन योग्य ती कारवाई करावी. समाजकंटकांना कोणत्याही किंमतीत सोडू नये" -राजपूत सभेचे अध्यक्ष रामसिंग चांदलाई
कायद्याच्या मर्यादेत राहून सर्वांनी या घटनेचा निषेध करावा : दुसरीकडं प्रताप फाऊंडेशनचे निमंत्रक महावीर सिंग सरवाडी यांनी, हा हल्ला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा पुरावा आहे. समाजातील सर्व जाती-वर्गातील सदस्यांनी कायद्याच्या मर्यादेत राहून या घटनेचा निषेध करण्याचं आवाहन केलंय. असं घडल्यास गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या विरोधात संपूर्ण राज्यातून एक मजबूत सामूहिकपणे आवाज उठवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :