माजी राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी BJP Leader Subramanian Swamy यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी West Bengal Chief Minister Mamata Banerjee यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुब्रमण्यम स्वामी लवकरच भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होतील, अशी अटकळ राज्याच्या राजकारणात वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे भाजपमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याशी त्यांचे संबंध तितकेसे सौहार्दाचे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते ममता बॅनर्जी यांच्या पक्षात सामील होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
राजकीय वर्तुळातील काही तज्ज्ञांच्या मते, सुब्रह्मण्यम स्वामी हे खरे तर अर्थतज्ञ आहेत, परंतु राष्ट्रीय राजधानीच्या राजकीय वर्तुळात त्यांना वादग्रस्त राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी वेगवेगळ्या वेळी दाखल केलेल्या अनेक खटल्यांनी देशभर गदारोळ झाला विशेषत: 2G केस, नॅशनल हेराल्ड केस आणि अयोध्या केस हे त्यापैकी काही आहेत.