हरिद्वार(उत्तर प्रदेश) - सिडकुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत दहावीचा विद्यार्थी १२वीच्या विद्यार्थ्याला मारण्यासाठी पिस्तुल (Student reached school with Pistol:) घेऊन शाळेत पोहोचला होता. मात्र, एकत्र शिकणाऱ्या मुलांनी समजूतदारपणा दाखवत शिक्षकांना याबाबत माहिती दिली, त्यामुळे घटना घडण्यापूर्वीच शिक्षकांनी विद्यार्थ्याला पिस्तुल आणि काडतुससह पकडले आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला सिडकुलला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आता आरोपी विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई करत आहेत. दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता, त्यानंतर दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हा वाद मनावर घेतल आणि तो बंदूक घेऊन थेट शाळेत पोहचला.
भांडणाचा बदला घेण्यासाठी केला प्लॅन - पेन्सिल, पेन आणि पुस्तकांशी खेळण्याच्या वयात दहावीच्या एका विद्यार्थ्याने चक्क शाळेचत पिस्तूल घेऊन गेल्याने शाळेत एकच खळबळ उढाली. मात्र, सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समजुतीमुळे पुढील अनर्थ टळला आहे. सिडकुल पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडकुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दोन दिवसांपूर्वी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचले, त्यानंतर शाळा व्यवस्थापनानेही दोन्ही मुलांची समजूत घातल्यानंतर प्रकरण मिटवले. मात्र, 10वीत शिकणारा विद्यार्थी त्याच्यावर झालेला हल्ला विसरू शकला नाही आणि त्याने 12वीच्या विद्यार्थ्याचा बदला घेण्यासाठी पिस्तुल घेऊन शाळा गाठली.
विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात - दहावीच्या विद्यार्थ्याने पिस्तुल दोनदा शाळेत फेरफटका मारून बारावीच्या त्या विद्यार्थ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, शाळेतील एका विद्यार्थ्याला ही पिस्तुल दिसली. त्यानंतर त्याने याची माहिती शाळा प्रशासनाला दिली. त्यानंतर शाळा प्रशासनाने लगेच त्या विद्यार्थ्याला पकडून त्याच्याजवळील पिस्तुल काढून घेतली. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी प्रमोद उनियाल यांनी सांगितले की, शाळेच्या तक्रारीनंतर त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे.