चंदिगढ - हरियाणातील पीक घेण्याचे दिवस आता संपले आहेत. आता पीक घेतल्यानंतर शेतातील उरलेला भाग जाळण्याचे दिवस आले आहेत. शेत न जाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरीही काही शेतकरी तो भाग जाळत आहेत. अशा शेतकऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
कुरुक्षेत्रात जाळपोळीच्या घटना -
गेल्यावर्षीच्या तुलनेत शेतातील कचरा जाळण्याच्या घटना वाढल्या आहेत. कुरुक्षेत्र जिल्ह्यात ७९८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यातील ३५० प्रकरणांची खात्री झाली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ८ लाख ४२ हजार रुपये दंड ठोठावला गेला आहे.
याठिकाणी सर्वात जास्त घटना -
कुरुक्षेत्रातील पिहोवा येथे सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. पिहोवा येथे २२१ प्रकरणे पुढे आले आहेत आणि यातील १२९ प्रकरणे चिन्हित केले गेले आहेत. शाहबाद भागात १७० प्रकरणे पुढे आली आहेत. थानेसर येथे १४८ घटना झाल्या आहेत.
सॅटेलाईटद्वारे नजर -
शेतातील कचरा पेटवण्याच्या घटनांवर आता प्रशासन सतर्कपणे नजर ठेवून आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून या सर्व घटनांवर प्रशासनाची नजर आहे. सरकार याबाबत अधिक प्रभावीपणे पावले उचलत आहे.
प्रदुषणात वाढ -
सरकारला याबाबत आणखी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू पाहताना अनुदान जाहीर करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रदुषणाचा स्तर सातत्याने वाढत आहे. दिवाळीदरम्यान फटाक्यांमधून होणारे प्रदूषण आणि शेतातील जाळपोळीच्या घटना यामुळे प्रदुषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असे सांगितले जात आहे.