हैदराबाद - सेन्सेक्स 1400 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आहे. सेन्सेक्स आज 52 हजार 888 वर ट्रेंड करत आहे. त्याचवेळी, निफ्टी 350 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आहे. निफ्टी 15 हजार 850 च्या खाली ट्रेंड करत आहे.
हेही वाचा - Cryptocurrency Prices 13 June 2022 : बिटकॉईनच्या दरात मोठी घसरण.. जाणून घ्या आजचे दर
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही हालचाल वाढली आहे. महागाईच्या आकडेवारीनंतर शुक्रवारी अमेरिकेचे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. त्याचा परिणाम इतर बाजारांवरही दिसून येईल, असा अंदाज होता. त्याचाच परिणाम आज भारतीय बाजारांवर दिसून येत आहे.
अमेरिकेतील महागाईचा परिणाम?
शुक्रवारी अमेरिकेत महागाईचे आकडे समोर आले होते. यात महागाईने विक्रम तोडल्याचे समोर आले. तेथे बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. इतर देशांच्या शेअर बाजारावर याचा परिणाम होईल, असा अंदाज लावण्यात आला होता. तसेच झालेही. सेन्सेक्स 1 हजार 400 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आहे.
हेही वाचा - Gold Silver Rate 11 June 2022 : सोने चांदीचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे दर