ETV Bharat / bharat

गुजरातहून 'रेमडेसिवीर' घेऊन येणार विमान ग्वाल्हेर विमानतळावर कोसळले - ग्वाल्हेर ऑक्सीजन कमतरता

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा घेऊन येणारे विमान ग्वाल्हेर विमानतळावर कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांसह एक अन्य व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे.

crashed-at-gwalior-airport
crashed-at-gwalior-airport
author img

By

Published : May 7, 2021, 1:53 AM IST

ग्वाल्हेर - रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन येणार स्टेट प्लेन ग्वाल्हेर विमानतळावर अपघातग्रस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार हे स्टेट प्लेन रनवे वर उतरत असताना कोसळले. या अपघातात वैमानिक कॅप्टन सईद माजिद अख्तर, सह वैमानिक जय शंकर जयस्वाल आणि एक अन्य व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान गुजरातहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा घेऊन ग्वाल्हेरला आले होते.

'रेमडेसिवीर' घेऊन येणार विमान ग्वाल्हेर विमानतळावर कोसळले

लँड करताना विमान पलटले -

प्लेन ग्वाल्हेर एयरपोर्टच्या रनवेवर उतरत असताना पलटले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन्ही वैमानिक जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह आणि पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना जयारोग्य रुग्णालयाचील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.