हैदराबाद महानगरपालिकेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत २९.७६ टक्के मतदान
हैदराबाद महापालिका निवडणुकीचे मतदान पार पडले
17:08 December 01
14:17 December 01
हैदराबादेत दुपारी १ वाजेपर्यंत १८.२ टक्के मतदान
हैदराबादेत सकाळी सुरुवातीच्या काही तासांत शहरातील काही प्रभागांमध्ये मतदान कमी झाले. मात्र, १० वाजेपासून मतदारांची संख्या वाढू लागली आहे. भारतातील पाचव्या क्रमांकाच्या महानगरात ७.४ दशलक्षांपेक्षा जास्त लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
13:02 December 01
तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी केले मतदान
तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत मतदान केले.
12:56 December 01
टीआरएस नेत्या के कविता यांनी केले मतदान
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत टीआरएस नेत्या के. कविता यांनी मतदान केले. "हैदराबादच्या लोकांनी बाहेर यावून मतदान करावे. मतदानाचा हक्क मिळविणे हा एक विशेषाधिकार आहे. जर तुम्ही मतदान केले नाही, तर तुम्हाला प्रश्न विचार करण्याचा हक्क राहत नाही, अशी प्रतिक्रिया कविता यांनी दिली."
12:55 December 01
12:34 December 01
जुन्या मलकपेटमध्ये मतदान थांबवले
मतपत्रिकेत पक्षाचे चिन्ह बदलल्याचे सांगत जुने मलकापेट विभागात मतदान थांबविण्याची माकपने मागणी केली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मतदान स्थगित करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
12:33 December 01
११ वाजेपर्यंत ८.९ टक्के मतदान
११ वाजेपर्यंत ८.९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
12:30 December 01
भाजपा आणि टीआरएस कार्यकर्त्यांमध्ये झटापट
केपीएचबी कॉलनीजवळील भाजपा कार्यकर्ते आणि टीआरएस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या मतदानाला गालबोट लागले. दरम्यान येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे.
12:26 December 01
पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी बजावला मतदानाचा हक्क
सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनीदेखील आपल्या कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावत दिसले.
11:06 December 01
अभिनेता चिरंजीवी यांनी पत्नीसह केले मतदान
मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांच्या पत्नीने हैदराबाद महापालिका निवडणुकीत मतदान केले. तेलंगणाचे मंत्री आणि टीआरएस नेते के टी रामाराव हेदेखील मतदानाचा हक्क बजावत दिसले.
11:04 December 01
विधानपरिषद आमदार एन रामचंदर यांनी केलं मतदान
विधानपरिषद आमदार एन रामचंदर यांनी मतदान केले आहे. सुट्टी असली तरी सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
11:02 December 01
नऊ वाजेपर्यंत 6.14 टक्के मतदान
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत 6.14% टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
08:27 December 01
खासदार असदुद्दीन ओवैसींनी केले मतदान
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मतदान केले. "लोकशाहीला बळकटी देण्यासाठी हैदराबादच्या जनतेने आज मतदान करावे," असे आवाहन त्यांनी केले.
07:48 December 01
के. टी. रामाराव यांनी केले मतदान..
तेलंगणाचे मंत्री, टीआरएस नेते के. टी. रामा राव यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
07:47 December 01
गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डींनी केले मतदान..
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सकाळच्या सत्रातच मतदान केले आहे.
07:45 December 01
मतदानाला सुरूवात..
सकाळी सात वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी बाळगत मतदान सुरू आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू आहे.
07:13 December 01
हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान..
हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्परेशन (जीएचएमसी)च्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या १५० प्रभागांमध्ये १,१२२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. ७४ लाखांहून अधिक मतदार या उमेदवारांचे भवितव्य आज ठरवतील.
सध्या महापालिकेवर तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे. ती कायम ठेवण्याचा प्रयत्न टीआरएस करेल. या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. टीआरएस, काँग्रेस आणि भाजपा सर्व जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर, एमआयएम हे केवळ ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे. यापूर्वी २०१६मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये टीआरएसला ९९, तर एमआयएमला ४४ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला त्यावर्षी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते.
भाजपने महापालिका निवडणूक केली प्रतिष्ठेची..
डुब्बक विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये बाजी मारलेल्या भाजपला आता महापालिका जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे आपली सर्व शक्ती पणाला लावत भाजप ही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही हैदराबादमध्ये आले होते.