ETV Bharat / bharat

Partha Chatterjee : पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा: मुख्यमंत्री ममतांची मोठी कारवाई.. पार्थ चॅटर्जीला मंत्रीपदावरून हटवले

author img

By

Published : Jul 28, 2022, 5:41 PM IST

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यानंतर आता पार्थ चॅटर्जी यांची खुर्ची गेली ( SSC recruitment scam fallout ) आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना मंत्रीपदावरून हटवले ( Partha Chatterjee sacked from cabinet ) आहे. पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री होते. आतापासून हे विभाग ममता बॅनर्जी स्वत: हाताळतील. ( Mamata Banerjee on Partha Chatterjee )

Partha Chatterjee Mamata Banerjee
पार्थ चॅटर्जी ममता बॅनर्जी

कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जीची ( SSC recruitment scam fallout ) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिपदावरून हकालपट्टी ( Partha Chatterjee sacked from cabinet ) केली. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. ( Mamata Banerjee on Partha Chatterjee )

मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय : दरम्यान, गुरुवारी ममतांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीनंतर काही वेळातच मंत्र्याला हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले. पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री होते. आता या विभागांची विभागणी ममता बॅनर्जी करणार आहेत.

ईडीकडून २३ जुलैलाच झाली आहे अटक : विशेष म्हणजे पार्थ चॅटर्जीला केंद्रीय एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २३ जुलै रोजी अटक केली होती. एजन्सीने अर्पिता मुखर्जीच्या अटकेपूर्वी तिच्या घरातून सुमारे २१ कोटी रुपये जप्त केले होते. सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमधील कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या वेळी पार्थ चॅटर्जी हे शिक्षण विभागाचे प्रभारी होते. नंतर हा विभाग त्यांच्याकडून घेतला गेला. शालेय सेवा आयोगाकडून शिक्षक भरतीमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपांची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे.

हेही वाचा : SSC recruitment scam: ईडीने जप्त केलेले कोट्यवधींचे घबाड पार्था चॅटर्जींचेच.. अर्पिता मुखर्जीचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.