ETV Bharat / bharat

Antilia Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी अख्तरची स्पेशल सेलकडून चौकशी

author img

By

Published : Mar 13, 2021, 5:06 PM IST

तिहार तुरुंगात कैद इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ मोनू शी आज स्पेशल सेलची टीम चौकशी करू शकते.

tahsin-akhtar-in-tihar-jail
tahsin-akhtar-in-tihar-jail

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक आज तिहार तुरुंगात पोहोचले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे, की स्पेशल सेल दहशतवादी अख्तरकडून जप्त केलेला मोबाइल आपल्या ताब्यात घेऊ शकते व संपूर्ण घटनाक्रमाबाबत तहसीन अख्तरची चौकशी करू शकते.

टेलीग्राम वर ग्रुप -

मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली एक कार आढळून आली होती. जैश उल हिंद या दहशवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली होती. मुंबई पोलिसांच्या तपासात या गोष्टीचा खुलासा करण्यात आला होता की, यासाठी टेलीग्राम वर बनवलेला ग्रुप तिहार तरुंगातून ऑपरेट होत हाता.

मोबाईल जप्त - -

स्पेशल सेलच्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर यामध्ये इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ मोनू यामध्ये सामील असल्याचे सांगितले गेले. स्पेशल सेल द्वारे दिल्या गेलेल्या माहितीवरून तिहार जेल प्रशासनाने तहसीन अख्तरकडून एक मोबाइल जप्त केला होता. हा मोबाईल फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवला जाईल. असेही सांगितले जात आहे, की स्पेशल सेल हा मोबाईल आपल्या ताब्यात घेऊ शकते.
हे ही वाचा - सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअ‌ॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख
दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम दहशतवादी तहसीन अख्तरची चौकशी करू शकते. पोलिसांचे पथक तिहार तुरुंगात पोहोचले आहे. त्यांच्या चौकशीतून प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.