ETV Bharat / bharat

SP Balasubramaniam Death Anniversary २०२३ : एसपी बालसुब्रमण्यम यांची आज पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचा संगीतमय प्रवास - एसपी बालासुब्रह्मण्यम

SP Balasubramaniam Death Anniversary 202 : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची आज पुण्यतिथी आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचं निधन झालं होतं. एसपी बालासुब्रमण्यम यांनी 40 हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. ते स्वतः मोहम्मद रफीचे मोठे चाहते होते.

SP Balasubramaniam
SP Balasubramaniam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 12:32 AM IST

Updated : Sep 25, 2023, 6:54 AM IST

हैद्राबाद SP Balasubramaniam Death Anniversary 202: गायकाच्या मधुर स्वरामुळं तालात भिजणारं प्रत्येक गाणं एक सुंदर कमळ म्हणून बहरतं! गीत म्हटलं की आपोआपच प्रत्येकाच्या आठवणी ताज्या होतात. एखाद्या गायकानं गायलेलं गीत आपल्याला आनंदित करते. गायकाच्या आवाजामुळं गीतासह गायकसुद्धा अजरामर होतात. आज (२५ सप्टेंबर) गायक श्रीपती पंडितराधुला बाला सुब्रह्मण्यम (एसपी बालासुब्रह्मण्यम) यांची पुण्यतिथी आहे. ते एसपी बालसुब्रह्मण्यम नावानं सर्वांना परिचीत आहेत. या सुप्रसिद्ध गायकाचं 2020 मध्ये निधन झालं होतं. बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी नेल्लोर जिल्ह्यातील कोनेतम्मा पेटात झाला होता. त्यांचे वडील सांबा मूर्ती प्रसिद्ध हरी कथा अभ्यासक होते. वडिलांच्या प्रेरणेनं बालासुब्रह्मण्यम यांनी लहानपणापासूनच गाण्याकडं लक्ष वळवलं.

पाच दशके आपल्या उत्तम आवाजाने त्यांनी लाखो लोकांना मंत्रमुग्ध केलं. 80 च्या दशकापासून त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. श्रीपती पंडितराध्युला बालासुब्रह्मण्यम यांना सर्व जण प्रेमानं ‘गण-गंधर्व’ (एसपी सुब्रह्मण्यम) म्हणूनही ओळखतात. एसपी यांनी आपल्या मधुर आवाजानं कित्येकांच्या मनावर राज्य केलं. तसंच तेलुगू सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. एसपी बालासुब्रमण्यम यांनी गायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, डबिंग कलाकार, चित्रपट निर्माता म्हणून काम केलं. त्यांनी सलमान खानच्या चित्रपटांसाठी अनेक गाण्यांना आवाज दिलाय. त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचे 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. एसपी बालासुब्रमण्यम यांना 2001 मध्ये पद्मश्री, 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

अनेक सुपरहिट गाणी : कमल हासनच्या 'एक दुजे के लिए' या चित्रपटील 'हम बने तुम बने एक दुजे के लिए' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. याशिवाय एसपी बाला सुब्रमण्यम यांनी सलमान खानच्या पहिल्या चित्रपट 'मैंने प्यार किया'साठी आवाज दिला होता. आजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई तो किस बात की है लड़ाई तू चल मैं आई हे गाण्यानं तरुणांच्या हृदयात जागा मिळवली होती. त्यावेळी S.P. बालासुब्रमण्यम यांची गाणीही खूप गाजली. त्यानंतर एस.पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली.

अभियंता व्हायचं होतं, पण... एस. पी. बालासुब्रमण्यम यांना अभियंता व्हायचं होतं. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील जवाहरलाल तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश घेतला. पण याच काळात ते खूप आजारी पडले. हा आजार गंभीर नव्हता. पण त्यातून सावरायला त्याला बराच वेळ लागला. यामुळं त्यांना इंजिनीअरिंग सोडावं लागलं. त्यांचं संगीत शिक्षण अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी नियमितपणे सुरू होतं. 1964 मध्ये त्यांनी 'हौशी' गायक म्हणून स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. यानंतर त्यांनी गायन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी अनेक बड्या दक्षिणेतील संगीतकार आणि गायकांसोबत सहाय्यक म्हणून काम केलं.

दक्षिणेतील 'रफी' : त्यांनी आपल्या गायकीला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. परिणामी, त्यांना पुढील दोन वर्षात म्हणजे १९६९ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी स्वतंत्रपणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचं पहिले गाणे त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच तेलुगूमध्ये त्यांनी गायलं. या गाण्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी त्यांनी कन्नड भाषेत एक गाणं रेकॉर्ड केलं. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना 'दक्षिणेचे रफी' म्हणून ओळखले जाते.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले : देशातील तिसऱ्या सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कारानं ए. पी. बालासुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलंय. याशिवाय सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपलं नाव कोरलंय 8 फेब्रुवारी 1981 रोजी त्यांनी सकाळी ९ ते रात्री ९ या बारा तासांत तब्बल 21 कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी एका दिवसात 19 तमिळ गाणी तसंच 16 हिंदी गाणी रेकॉर्ड केली होती. आपल्या पाच दशकांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत सुमारे सोळा भाषांमध्ये 40 हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. तसंच 40 हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शिन केलं आहे.

हेही वाचा -

  1. Ragneeti Weeding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा-आप नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले, चाहत्यांना फोटोची प्रतिक्षा
  2. Rashmika Mandanna Animal first look : रणबीरच्या अ‍ॅनिमलमधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, भेटा गीतांजलीला
  3. Allu Arjun meets Atlee : मुंबईत अ‍ॅटलीच्या भेटीसाठी अल्लु अर्जुन, नव्या सिनेमासाठी दोघांची हात मिळवणी

Last Updated : Sep 25, 2023, 6:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.