हैदराबाद Southwest Monsoon 2023 Report : एका अहवालानुसार, या वर्षीच्या मान्सून काळात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला. 'कार्बन कॉपी'च्या हवामानाच्या ट्रेंडच्या अहवालानुसार, देशातील ७३ टक्के भागात सामान्य पाऊस झाला आहे. परंतु जिल्हानिहाय डेटानं नैऋत्य मान्सूनसाठी उलट कल दर्शविलाय.
ऑगस्ट महिन्यात सर्वात वाईट परिस्थिती : अहवालात असं म्हटलं आहे की, पावसाळ्यात ८१,८५२ सामान्य पावसाच्या दिवसांपैकी सुमारे ६ टक्के पाऊस पडला. ११५.६ मिमी पेक्षा जास्त पर्जन्यवृष्टीसह गेल्या पाच वर्षांत भारतानं दुसऱ्या क्रमांकाच्या अतिवृष्टीच्या घटना पाहिल्या आहेत. अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात सर्वात वाईट परिस्थिती होती. ७६ टक्क्यांहून अधिक पावसाच्या दिवसांमध्ये कमी पाऊस किंवा बिलकुल पाऊस पडला नाही.
जुलै महिना सर्वोत्तम कामगिरी करणारा : अहवालात म्हटलं आहे की, जुलै महिना सर्वोत्तम कामगिरी करणारा महिना होता. जुलैमध्ये १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे, जो २००५ नंतरचा दुसरा सर्वाधिक पाऊस होता. जुलै महिन्यात जूनच्या खराब कामगिरीची भरपाई झाली, जी १० टक्के पावसाच्या कमतरतेसह संपली. अहवालात असंही म्हटलं आहे की, ऑगस्ट या मुख्य मान्सूनच्या महिन्यात फक्त ३६ टक्के पाऊस झाला.
पूर आणि अतिवृष्टीच्या ५४४ घटनांची नोंद : मान्सूनच्या काळातील पुराच्या अहवालात असं म्हटलं आहे की, संपूर्ण हंगामात भारतात पूर आणि अतिवृष्टीच्या ५४४ घटनांची नोंद झाली. राज्यांमध्ये, हिमाचल प्रदेश १२३ घटनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महाराष्ट्र ६९ आणि उत्तराखंड ६८ घटनांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. मान्सून वेळेवर परतल्यानं देशाला आणखी एका संभाव्य दुष्काळाच्या भीतीपासून वाचवलं असल्याचं अहवालात म्हटलंय.
कोणत्या विभागात केवढा पाऊस : अहवालात पुढे म्हटलं आहे की, देशातील ३६ हवामान उपविभागांपैकी २६ उपविभागांमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली. ही देशाच्या क्षेत्राच्या ७३ टक्के आहे. अहवालानुसार, ७ उपविभागांमध्ये कमी पावसाची नोंद झाली. यात देशाच्या १८ टक्के क्षेत्राचा समावेश आहे. तर केवळ ३ उपविभागांमध्ये जास्त पावसाची नोंद झाली. यात ७ टक्के क्षेत्राचा समावेश आहे.
हेही वाचा :