ETV Bharat / bharat

Brij Lal Khabri: उत्तर प्रदेश काँग्रेसची जबाबदारी ब्रिजलाल खबरींवर! बसपाची व्होटबँक वळवण्याचा प्रयत्न

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यूपीची जबाबदारी दलित नेते ब्रिजलाल खबरी यांच्याकडे सोपवली आहे. (Brij Lal Khabri) काँग्रेसची ही खेळी म्हणजे पक्षाच्या नजरा आता बसपच्या पारंपरिक व्होटबँकेकडे लागल्याचे स्पष्ट संकेत आहेत. 'ईटीव्ही भारत'चा यावर खास रिपोर्ट

उत्तर प्रदेश काँग्रेसची जबाबदारी ब्रिजलाल खबरी यांच्यावर

author img

By

Published : Oct 1, 2022, 5:52 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी (दि. 1 ऑक्टोबर)रोजी दलित नेते ब्रिजलाल खाबरी यांची उत्तर प्रदेश युनिटच्या प्रमुखपदी निवड केली. गेल्या तीन दशकांत काँग्रेसने आपली पारंपारिक दलित व्होट बँक बसपामुळे गमावली आहे. दरम्यान, यूपीमध्ये काँग्रेस आणि बसपा हे दोन्हीही पक्ष गेल्या काही वर्षांत कमकुवत झालेले आहेत.

2017 मध्ये, 403 सदस्यांच्या यूपी विधानसभेत काँग्रेसकडे फक्त 7 जागा होत्या, तर बसपाला 19 जागा होत्या. तर 2022 मध्ये काँग्रेसकडे फक्त 2 आणि बसपाकडे फक्त 1 जागा आहे. ब्रिजलाल खबरी हे सध्या बिहारचे प्रभारी AICC सचिव आहेत. ( Dalit leader Brij Lal Khabri new UP chief) बृजलाल खबरी यांनी 2016 मध्ये बसपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधी यांनी सहा प्रादेशिक प्रभारींचीही नियुक्ती केली आहे, जे मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य व्यवस्थापित करण्यासाठी नवीन राज्य युनिट प्रमुखांना मदत करणार आहेत.

विशेष म्हणजे, नसीमुद्दीन सिद्दीकी आणि नकुल दुबे हे दोघेही बसपचे सदस्य असून, त्यांनी मागील वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मायावती सरकारमधील माजी मंत्री सिद्दीकी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, दुबे यांनी या वर्षी मे महिन्यात विधानसभा निवडणुकीत बसपच्या खराब कामगिरीनंतर सर्वात जुन्या पक्षात प्रवेश केला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सोनियांनी तत्कालीन राज्य युनिट प्रमुख अजय कुमार लल्लू यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. विविध कारणांमुळे नवीन व्यक्तीची नियुक्ती लांबणीवर पडली होती. काँग्रेसने शनिवारी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की यूपीमध्ये पक्ष पुन्हा मजबूत करणे कठीण काम आहे.

पक्ष उभा करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत पण आम्ही त्यांचा खंबीरपणे सामना करू अस खबरी म्हणाले आहेत. पक्षाची एकजूट आणि संघटना मजबूत करणे हे माझे पहिले प्राधान्य असेल. त्यांच्या मते, काँग्रेसला बसपच्या घटत्या पाठिंब्याचा फायदा घेण्याची संधी आहे. 'दलित मतदार आमच्याकडे परत येतील. बसपा हा आता संपला आहे. मी बसपामध्ये असलेला पाठिंबा एकत्र करेन आणि काँग्रेसची पुनर्रचना करेन असही ते म्हणाले आहेत. सोनिया गांधी, प्रियंका गांधी वढेरा आणि राहुल गांधी यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो मी पूर्ण करेन, असेही ते म्हणाले आहेत.

सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष सपाला कशी टक्कर देता येईला याच्यावर भर असेल असही ते म्हणाले आहेत. यूपी काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणाले, 'सामाजिक ध्रुवीकरणामुळे भाजप जिंकतो. सपाच्या 14 टक्के मुस्लिम समर्थकांना काढून टाकले तर त्यांची अवस्था बसपापेक्षा वाईट होईल. यूपी हे नेहरू-गांधी घराण्याचे गृहराज्य असल्याने काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. रायबरेलीच्या लोकसभेत सोनिया गांधी या एकमेव पक्षाच्या खासदार आहेत. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये त्यांचा बालेकिल्ला अमेठी गमावला.

या वर्षी एप्रिलमध्ये राहुल यांनी मायावतींवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की मायावतींनी यूपीमध्ये काँग्रेससोबत युती करण्यास नकार दिला, त्यामुळे भाजपला वॉकओव्हर मिळाला. त्याचवेळी राहुल यांनी बसपा संस्थापक कांशीराम यांचे कौतुकही केले होते. कांशीराम समाजाच्या हक्कांसाठी लढले, असे राहुल म्हणाले होते. राहुल यांचे हे पाऊल बसपाच्या व्होट बँकेचे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न होता.

प्रियांकाने लल्लू आणि आराधना यांच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्था, महिलांवरील गुन्हे, दलितांना न्याय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी आणि तरुणांना नोकऱ्या यासह विविध मुद्द्यांवर राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात अनेक आंदोलने केली. कोविड महामारीच्या काळात पायी जावे लागलेल्या हजारो स्थलांतरित कामगारांसाठी 1000 बसेसची व्यवस्था करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र, राज्य सरकारने त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि वाहनांकडे योग्य कागदपत्रे नसल्याचे सांगत बसेसना परवानगी दिली नाही.

राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांची मुलगी आराधना मिश्रा हिला प्रियांकाने दुसऱ्या टर्मसाठी सीएलपी बनवले. ज्यांनी आता दुसरे आमदार वीरेंद्र चौधरी यांना खबरी अंतर्गत प्रदेश प्रभारी बनवले आहे. नसीमुद्दीन सिद्दीकी, नकुल दुबे आणि वीरेंद्र चौधरी यांच्याशिवाय इतर तीन प्रदेश प्रभारी माजी आमदार अजय राय, योगेश दीक्षित आणि अनिल यादव आहेत. राय हे पंतप्रधान मोदींचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील पिंद्रा येथील माजी आमदार आहेत. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी वाराणसीतून मोदींविरोधात लढवली होती. दीक्षित हे पक्षाचे जुने नेते आहेत आणि यादव, गांधी घराण्याचे निष्ठावंत, पश्चिम उत्तर प्रदेशातील इटावा येथील आहेत. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यूपीमध्ये आवश्यक असलेली विविध जातीय समीकरणे लक्षात घेऊन नवीन संघाला अंतिम रूप देण्यावर गेल्या आठवड्यात चर्चा झाली. काँग्रेस चालवायची असेल तर ब्राह्मण, ठाकूर, ओबीसी किंवा दलित नेता यापैकी एकाची निवड करावी लागली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.