नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जातील Sonia Gandhi to travel abroad आणि राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा त्यांच्यासोबत जाणार आहेत, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सांगण्यात आले. प्रवासाची किंवा त्यांच्या भेटीची कोणतीही विशिष्ट तारीख सांगितली गेली नाही, परंतु राहुल गांधी 4 सप्टेंबर 2022 रोजी येथे काँग्रेसच्या मेहंगाई पर हल्ला बोल रॅलीला संबोधित करतील, असे सांगण्यात आले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार आहेत. त्या नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्यांच्या आजारी आईचीही भेट घेणार आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे. राहुल आणि प्रियांका गांधी काँग्रेस अध्यक्षांसोबत प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी 4 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्लीत काँग्रेसच्या मेहंगाई पर हल्ला बोल रॅलीला संबोधित करतील, असे रमेश म्हणाले. त्यांचा परदेश दौरा अशा वेळी आला आहे जेव्हा पक्ष 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेची तयारी करत आहे.
काँग्रेसचा महागाई विरोधात हल्लाबोल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राजधानी दिल्लीत महागाई विरोधात तीव्र आंदोलन केले होते. यासोबत देशभरात विविध ठिकाणी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. सोनिया गांधींच्या नेतृत्वात संसदेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना काळे कपडे परिधान करीत हे आंदोलन केले होते.
राहुल, प्रियांका यांना अटक या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात अत्यंत तीव्र निदर्शने केली होती. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रपती भवनाकडे कूच करीत निघाले होते. पोलिसांनी त्यांना वाटतेच अडविले. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांना त्यांना अटक करावी लागली होती. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनाही पोलिसांना अटक केली होती.
भष्टाचारावरून लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस हे सर्व करीत आहे, असा आरोप सत्ताधारी पार्टी भारतीय जनता पार्टीने केला होता. कारण हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना डेक्कन हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणी इडी समन्स बजावित चौकशीसाठी बोलाविले होते. सोनिया गांधी यांची तीन वेळा चौकशी झाली होती. हे सर्व दाबण्यासाठीच, जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्वकाही करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला होता.