बुलदंशहर - आज सकाळी भाजपाचे माजी आमदार होराम सिंह यांच्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. २००७ पासून जेवर विधानसभेचे माजी आमदार होराम सिंह खुर्जामधील किला गावात राहतात. आज सकाळी त्याच्या मोठ्या मुलाने गोळी झाडून आत्महत्या केली. महेश असे आत्महत्या केलेल्या ३० वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती सिंह यांच्या घरच्यांनी पोलिसांना फोन करून दिली.
सिंह यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी गोळीचा आवाज आला. तेव्हा सगळे जण महेशच्या खोलीकडे धावलो. तेव्हा तिथे पाहिले की, महेश जमीनवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि त्याच्या शेजारी बंदूक पडलेली होती. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळावरुन बंदूक ताब्यात घेतली आहे. ही बंदूक परवानधारक आहे. दरम्यान, अद्याप या प्रकरणात सिंह कुटुंबाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - मध्य प्रदेश : आता फटाक्यांपासून मिळणार फळे आणि भाज्या
हेही वाचा - 'दिव्याप्रमाणे सीमेवरील जवान देशाला प्रज्वलित करतायेत'