ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये संशयास्पद अवस्थेत जवानाचा आढळला मृतदेह - JKs Rajouri Garrison

24 वर्षीय जवानाचा मृतदेह हा 8 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 8 वाजता राजौरी येथे आढळून आला. त्याबाबत न्यायालयाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

जम्मू काश्मीर जवानाचा मृत्यू
जम्मू काश्मीर जवानाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 9, 2021, 9:36 AM IST

श्रीनगर - राजौरी येथे 24 वर्षीय जवानाचा मृतदेह रविवारी संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. जवानाच्या मृत्यूचे कारण तपासण्यासाठी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे भारतीय सैन्यदलाने म्हटले आहे.

24 वर्षीय जवानाचा मृतदेह हा 8 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 8 वाजता राजौरी येथे आढळून आला. त्याबाबत न्यायालयाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या कारणाने जवानाचा मृत्यू झाला, याबाबत तपास होणार असल्याचे भारतीय सैन्यदलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा-कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र डोस प्रभावी; ICMR च्या अभ्यासाचा निष्कर्ष

एनआयएने जम्मू आणि काश्मीरमध्ये 40 ठिकाणी टाकले छापे-

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना टेरर फंडिंग प्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएच्या पथकाने रविवारी सकाळी अनंतनाग जिल्ह्यात छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 40 ठिकाणी एनआयएचे छापे टाकले आहेत. यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफचेही सहकार्य घेतले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने रविवारी केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरमधील 40 ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यात श्रीनगर, गंदरबल, अचबल, शोपिया, बांदीपोरा, रामबन, दोडा, किश्तवाड, राजौरी आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. एनआयएचे हे छापे दहशतवादाला पुरवण्यात आलेल्या निधीसह इतर नवीन प्रकरणांशी संबंधित आहे. संबंधित ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे.

हेही वाचा-आता व्हॉट्सअ‌ॅपद्वारे काही सेकंदातच मिळणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.