नवी दिल्ली : भारताचे चंद्रयान ३ बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले. यासह भारत चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलेल्या चार देशांमध्ये सामील झाला आहे. भारताच्या या यशाबद्दल जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. मिशनच्या यशाबद्दल अमेरिकेतील भारतीय दूतावासात मिठाई वाटण्यात आली.
नासाने केले अभिनंदन : इस्रोच्या यशस्वी मोहिमेसाठी नासाने भारताचे अभिनंदन केले. 'चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल @ISRO चे अभिनंदन! तसेच चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे सॉफ्ट-लँड करणारा चौथा देश बनल्याबद्दल #भारताचे अभिनंदन. या मिशनमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे!' असे ट्विट नासाने केले.
-
🎥 Witnessing History from Dublin! 🙌
— BCCI (@BCCI) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The moment India's Vikram Lander touched down successfully on the Moon's South Pole 🚀#Chandrayaan3 | @isro | #TeamIndia https://t.co/uIA29Yls51 pic.twitter.com/OxgR1uK5uN
">🎥 Witnessing History from Dublin! 🙌
— BCCI (@BCCI) August 23, 2023
The moment India's Vikram Lander touched down successfully on the Moon's South Pole 🚀#Chandrayaan3 | @isro | #TeamIndia https://t.co/uIA29Yls51 pic.twitter.com/OxgR1uK5uN🎥 Witnessing History from Dublin! 🙌
— BCCI (@BCCI) August 23, 2023
The moment India's Vikram Lander touched down successfully on the Moon's South Pole 🚀#Chandrayaan3 | @isro | #TeamIndia https://t.co/uIA29Yls51 pic.twitter.com/OxgR1uK5uN
सोशल मीडियावर अभिनंदनाचा ओघ : इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा ओघ सुरू आहे. 'आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान आहे', असे ट्विट प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले. 'धन्यवाद, धन्यवाद, @ISRO. आपल्या क्षमतेवर विश्वास कसा ठेवावा, अपयशाला कसे सामोरे जावे आणि त्याचा व्यासपीठ म्हणून वापर कसा करावा, हे तुम्ही आम्हाला शिकवले, असे आनंद महिंद्रा म्हणाले. चांद तारे तोड लाऊं….सारी दुनिया पर में छाऊं. आज भारत आणि @isro ने कमाल केली. सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन... चंद्रयान-३ यशस्वी झाले आहे, असे ट्विट बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने केले.
-
Many congratulations to the #Chandrayaan3 team. You have made the nation proud 🇮🇳
— Virat Kohli (@imVkohli) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Jai Hind!
">Many congratulations to the #Chandrayaan3 team. You have made the nation proud 🇮🇳
— Virat Kohli (@imVkohli) August 23, 2023
Jai Hind!Many congratulations to the #Chandrayaan3 team. You have made the nation proud 🇮🇳
— Virat Kohli (@imVkohli) August 23, 2023
Jai Hind!
अनोख्या शैलीत शुभेच्छा : लेखक आणि ज्येष्ठ संपादक आनंद रंगनाथन यांनी अनोख्या शैलीत देशाला शुभेच्छा दिल्या. ब्रह्मगुप्ताने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्यानंतर 1500 वर्षांनी, भास्कराने कॅल्क्युलसचा शोध लावल्यानंतर 1000 वर्षांनी, नीलकंठाने सूर्यकेंद्री मॉडेल प्रदान केल्यानंतर 500 वर्षांनी, चंद्राचे अंतर मोजल्यानंतर 100 वर्षांनी आणि भारत अवकाशात गेल्यानंतर 50 वर्षांनी, आपल्याला आपला सर्वोत्कृष्ट वेळ मिळाला, असे ट्विट त्यांनी केले.
-
#WATCH | Washington DC, US: Sweets being distributed at the Embassy of India as Chandrayaan-3 successfully lands on the Moon pic.twitter.com/V0C3oxnZTL
— ANI (@ANI) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Washington DC, US: Sweets being distributed at the Embassy of India as Chandrayaan-3 successfully lands on the Moon pic.twitter.com/V0C3oxnZTL
— ANI (@ANI) August 23, 2023#WATCH | Washington DC, US: Sweets being distributed at the Embassy of India as Chandrayaan-3 successfully lands on the Moon pic.twitter.com/V0C3oxnZTL
— ANI (@ANI) August 23, 2023
टीम इंडियाने अभिनंदन केले : चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर भारतीय क्रिकेट समुदायाने इस्रोचे अभिनंदन केले. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय संघाचा व्हिडिओ पोस्ट केला. यासह स्टार क्रिकेटपटू विराट कोहली, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, केएल राहुल, युझवेंद्र चहल, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला.

हेही वाचा :