बंगळुरू : बँकॉकवरुन बंगळुरुमध्ये वन्यप्राण्यांची तस्करी करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी एअर कस्टम अधिकाऱ्यांनी दोन ट्रॉली बॅगमध्ये आणलेले अजगर, दुर्मीळ कासवं, कांगारू आदी 234 वन्यप्राणी जप्त केले आहेत. या तस्करी प्रकरणी एअर कस्टम विभागानं एका तस्कराला 21 ऑगस्टच्या रात्री अटक केल्याची माहिती दिली आहे.
ट्रॉलीमध्ये आढळून आले वन्यप्राणी : बँकॉकवरुन आलेल्या विमान क्रमांक एफडी 117 या विमानानं एक प्रवासी बँकॉकवरुन बंगळुरुच्या देवनहळ्ळी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्या प्रवाशाची एअर कस्टम अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली असता, त्याच्या ट्रॉलीमध्ये दुर्मीळ कासव, अजगर, छोटा कांगारू आदी 234 वन्यप्राणी आढळून आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. वन्यप्राण्यांची तस्करी करण्यात येत असल्यानं एअर कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला अटक केली.
दुर्मीळ कासव, कांगारू, अजगरांची केली सुटका : बँकॉकवरुन आलेल्या या प्रवाशानं त्याच्या ट्रॉलीमध्ये 234 दुर्मीळ वन्यप्राण्यांना आणलं होतं. या प्रवाशाच्या झाडाझडतीत सापडलेले हे वन्यप्राणी दुर्मीळ असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे एअर कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्या तावडीतून अजगर, कांगारू, दुर्मीळ कासवं, सरडा आदी 234 वन्यप्राण्यांची सुटका केली आहे. एअर कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला सीमा शुल्क कायदा 1962 च्या कलम 104 नुसार अटक केल्याची माहिती एअर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दुबईतून नट बोल्ट बनवून सोन्याची तस्करी : बंगळुरू इथच्या देवनहळ्ळी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सोन्याची तस्करी होत असल्याची घटना 18 ऑग्सटला उघड झाली होती. त्यावेळी दुबईवरुन आलेल्या विमान क्रमांक 568 मधील प्रवाशाला एअर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करताना पकडलं होतं. या प्रवाशानं त्याच्या सामानाच्या बॅगेत सोन्याच्या नट बोल्टची तस्करी केल्याचं उघड झालं होतं. या प्रवाशाला अटक करुन एअर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील 267 ग्रॅम सोनं जप्त केलं होतं.
हेही वाचा -