ETV Bharat / bharat

पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही, तक्रारदार वैतागून एसएलआर घेऊन फरार; ठार मारण्याची दिली धमकी - जसविंदर सिंग

पोलीस ठाण्यात आपले म्हणणे ऐकून घेत नाहीत या रागातून एका तरुणाने एसएलआर हिसकावून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. जसविंदर सिंग असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई केली नाही तर या एसएलआरचा (Self Loading Rifle) वापर करून त्यांना ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली आहे.

एसएलआर
एसएलआर
author img

By

Published : Oct 3, 2022, 6:02 PM IST

गुरुदासपूर (पंजाब) - पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये सोमवारी आज (दि. 3 ऑक्टोबर)रोजी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रारदाराचे म्हणणे ऐकून न घेता पोलीस ठाण्यातील संत्रीचा एसएलआर हिसकावून पळ काढला. जसविंदर सिंग हा शीख तरुण गेल्या अनेक दिवसांपासून गुरदासपूरच्या कासवा धारिवाल पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवण्यासाठी येत होता. (Self Loading Rifle) मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने पोलीस ठाण्यातील संत्रीचा एसएलआर हिसकावून घेतला अन् पळ काढला.

व्हिडिओ

तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला, ज्यात पोलीस स्टेशनचे एसएचओ सरबजीत सिंग यांनी आपली तक्रार नोंदवत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच काही लोकांनी त्याच्या घरावर हल्ला केला आणि विटा आणि दगड फेकले. त्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून आपण पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत होतो. मात्र, कारवाई करण्याऐवजी सरबजीतसिंग त्याच्यावर क्रॉस केस नोंदवण्याबाबत बोलत असल्याचे त्याने सांगितले आहे.

व्हिडिओ

पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई केली नाही तर या एसएलआरचा वापर करून त्यांना ठार मारेन, त्याची जबाबदारी पोलिसांची असेल, अशी धमकी जसविंदरने दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर कारवाई केल्यास हिसकावलेले शस्त्र परत करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक हिलोरी यांनी सांगितले की, पोलिसांनी तातडीने कारवाई करत जसविंदरच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याला अटक केली आहे. तसेच, एसएलआरही जप्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.