ETV Bharat / bharat

राजस्थानच्या अलवरमध्ये सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

राजस्थानच्या अलवरमध्ये एका सहा वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी असे आरोपीचे नाव आहे.

author img

By

Published : Feb 12, 2021, 4:28 PM IST

अलवर बलात्कार घटना
अलवर बलात्कार घटना

अलवर - देशातील विविध भागात बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. राजस्थानच्या अलवरमध्ये एका सहा वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेजारी राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

रवी असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान चिमुकली घराबाहेर खेळत होती. तेव्हा आरोपीने मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्काराच्या घटना -

बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तीन ते चार बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. बिहारमधील मोतिहारी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसेच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीचे दोरीने हात-पाय आणि ओढणीने तोंड बांधून 29 वर्षीय नराधम आरोपीने बलात्कार केला.

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी -

बलात्काराची प्रत्येक घटना वेदनादायी तसंच बिभत्सही असते. बलात्काराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी अनेकदा कठोर कारवाईची मागणी होत असते. भारतात दुर्मिळातल्या दुर्मीळ गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात येते. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचा गुन्हा 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जगभरात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. अनेक देशांमध्ये बलात्कारापेक्षा बाल लैंगिक शोषण हा अधिक मोठा गुन्हा समजला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.