ETV Bharat / bharat

श्रीलंकेच्या नौदलानं 6 भारतीय मच्छिमारांना घेतलं ताब्यात, आठवड्याभरातील दुसरी घटना - तामिळनाडू सरकार

Sri Lankan Navy Detained 6 Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तामिळनाडूतील मच्छिमारांना याचा मोठा फटका बसला आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना असून यावेळी ६ मच्छीमारांना अटक केली आहे.

Sri Lankan Navy Detained 6 Indian Fishermen

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 12:08 PM IST

कोलंबो Sri Lankan Navy Detained 6 Indian Fishermen : आंतरराष्ट्रीय पाण्याच्या क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या तामिळनाडूतील सहा भारतीय मच्छिमारांना त्यांच्या ट्रॉलरसह श्रीलंकेच्या नौदलानं श्रीलंकेच्या कानकेसंथुराई भागाजवळ ताब्यात घेतलंय. श्रीलंकेच्या नौदलाच्या म्हणण्यानुसार, कथितपणे हे मच्छिमार शिकारीत सहभागी झाले होते. बुधवारी विशेष कारवाईनंतर त्यांना करीनगरमधील कोविलन दीपगृहातून ताब्यात घेण्यात आलंय.

सहापैकी पाच मच्छिमारांची ओळख : स्थानिक मच्छिमारांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी आणि परदेशी मासेमारी करणार्‍यांना प्रतिबंध करण्यासाठी श्रीलंकेच्या पाण्यात नियमित गस्त आणि ऑपरेशन केले जातात. हे सहा मच्छिमार तामिळनाडूच्या पुदुक्कोट्टई जिल्ह्यातील होते. सहापैकी पाच मच्छिमारांची ओळख पटली आहे. सहाव्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. नौदलानं सांगितलं की, ताब्यात घेतलेल्या मच्छिमारांना कनकसंथुराई बंदरात आणण्यात आलंय आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना मालाडी मत्स्य निरीक्षकाकडे सोपवण्यात येणार आहे.

यापूर्वी 25 मच्छिमारांना घेतलं होतं ताब्यात : काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील पॉइंट पेड्रो शहराजवळ श्रीलंकन ​​नौदलानं तामिळनाडूच्या 12 आणि पॉंडेचेरीच्या 13 अशा 25 मच्छिमारांना ताब्यात घेतलं होतं. तर गेल्या महिन्यात 27 भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली होती. ते वेगवेगळ्या दिवशी 12 आणि 15 जणांच्या गटात चेन्नई विमानतळावर परतले होते.

यावर्षी आतापर्यंत 220 मच्छिमारांना अटक : यापूर्वी ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेच्या नौदलानं तीन वेगवेगळ्या अटकेत एकूण 64 मच्छिमारांना अटक केली होती. यापूर्वी एका निवेदनात असं म्हटलं होतं की, 2023 मध्ये आतापर्यंत 220 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलानं पकडलंय. विशेषत: भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलानं केलेली अटक हा तामिळनाडू सरकार तसंच भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय ठरलाय. ऑक्टोबरमध्ये, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून श्रीलंकेच्या ​​नौदलाकडून तामिळनाडूतील मच्छिमारांच्या वारंवार अटकेचा मुद्दा अधोरेखित केला होता. तमिळनाडूच्या मच्छिमारांच्या पाल्‍क खाडीतील पारंपरिक मासेमारीच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला होता.

हेही वाचा :

  1. Boat drowned in Sea: मुंबईच्या समुद्रात बोट उलटली; 2 मच्छीमार बुडाल्याची भीती, शोध मोहीम सुरू
  2. Navy Fired on Fisherman: नौदलाच्या गोळीबारात एक मच्छिमार जखमी, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.