ETV Bharat / bharat

उत्तराखंड टनेल रेस्क्यू ऑपरेशन फत्ते; बोगद्यातील सर्व 41 कामगारांना काढलं सुरक्षित बाहेर, रॅट मायनिंगचा केला वापर - बोगद्यातील 41 कामगारांना काढले बाहेर

Silkyara Tunnel Accident : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बचावासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा आज १७ वा दिवस आहे. सिलक्यारा बोगद्यातून आता कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे. सुरुवातीला तीन कामगार सुरक्षित बाहेर काढले आहेत. तर आता एक-एक असे हे सर्व 41 कामगार बाहेर काढण्यात येत आहेत.

Silkyara Tunnel Accident
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 1:35 PM IST

Updated : Nov 28, 2023, 10:09 PM IST

देहरादून(उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात (Uttarakhand Tunnel Rescue Successfully) आलं होतं. मंगळवारी या बचावकार्याचा १७ वा दिवस होता. या बोगद्यात अडकलेले सर्व कामगार एक-एक करुन बाहेर काढण्यात आले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बाहेर आल्यावर या सर्व (Trapped Workers Successfully Evacuated) कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

  • Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | During the rescue operations, one of the workers showed victory sign while he was being rescued

    All the 41 trapped workers have been successfully evacuated pic.twitter.com/1MF3j1od8E

    — ANI (@ANI) November 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कामगारांना अन्न आणि ऑक्सिजनचा केला होता पुरवठा : मागील 17 दिवसांपासून सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना 17 व्या दिवशी यश आलंय. बचावकार्यासाठी सगळ्या यंत्रणा जोमानं काम करत होत्या. या कामगारांना बोगद्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत होती. या सर्व कामगारांना अन्न, पाणी, ऑक्सिजनचा वेळोवेळी पुरवठा केला जात होता. तसेच प्रशासन आणि डॉक्टर्स हे या सर्व कामगारांच्या कायम संपर्कात होते.

बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यात आलं यश : सिलक्यारा बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात येणारी बचाव मोहीम तीव्र करण्यात आली होती. अमेरिकन ऑगर मशीनमुळं घटनास्थळावरील बचावकार्यास गती आली होती. अखेर मंगळवारी बोगद्यातून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.

  • I feel relieved and happy to learn that all the workers trapped in a tunnel in Uttarakhand have been rescued. Their travails over 17 days, as the rescue effort met with obstacles, have been a testament of human endurance. The nation salutes their resilience and remains grateful…

    — President of India (@rashtrapatibhvn) November 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हायटेक मशिनरी फेल : उत्तरकाशीच्या सिल्कारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ७ राज्यांतील ४१ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. जगण्यासाठी सुरू असलेली 17 दिवसांची लढाई कामगारांनी जिंकली आहे. या बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा आणि देश-विदेशातील शास्त्रज्ञांचे परिश्रमही यामध्ये होते. कामगारांना बाहेर काढण्यासाठी राज्यापासून केंद्रापर्यंत सर्वच यंत्रणा काम करत होती. या बचावकार्यासाठी मशिनरी फेल ठरल्या असल्याचं दिसून आलं. अखेर भारतीय सैन्यदल आणि इतर कामगारांच्या मदतीनं बोगद्यात जाण्यासाठी खोदकाम करण्यात आलं आणि यालाचा यश आलं. त्यामुळं करोडो रुपयांच्या हायटेक मशिनरी यात फेल गेल्या हे सिद्ध झालं. 'मद्रास सॅपर्स' या भारतीय सैन्याच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सच्या 12 आणि 9 कामगारांच्या तुकडीनं बचावकार्याची कमान हाती घेतली आणि अडकलेल्या लोकांना मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे वाचवलं. रॅट माइनिंग तंत्राचा वापर करून डोंगराचा सुरुवातीचा भाग उघडण्यासाठी कामगारांसह सैन्य दलाला सुमारे 16 ते 17 तास लागले होते.

  • उत्तरकाशी में हमारे श्रमिक भाइयों के रेस्क्यू ऑपरेशन की सफलता हर किसी को भावुक कर देने वाली है।

    टनल में जो साथी फंसे हुए थे, उनसे मैं कहना चाहता हूं कि आपका साहस और धैर्य हर किसी को प्रेरित कर रहा है। मैं आप सभी की कुशलता और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं।

    यह अत्यंत…

    — Narendra Modi (@narendramodi) November 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानांकडून रेस्क्यू टीमचं अभिनंदन : या बचावकार्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेळोवेळी आढावा घेत होते. बचावकार्य पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करुन सविस्रर माहिती घेतली. तसेच पंतप्रधान मोदींनी सर्व यंत्रणांचं अभिनंदन केलं. आता या सर्व कामगारांना आरोग्य सुविधा देऊन त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची जबाबदारीही उत्तराखंड सरकारनं घेतली आहे. या रेस्क्यू ऑपरेशननंतर राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व रेस्क्यू टीमचं अभिनंदन केलं.

हेही वाचा :

  1. उत्तराखंडमधील प्रस्तावित ६६ बोगद्यांच्या बांधकामाचं काय होणार? उत्तरकाशी दुर्घटनेनंतर शास्त्रज्ञांचा सरकारला 'हा' सल्ला
  2. उत्तराखंड सिलक्यारा बोगदा बचावकार्याचा 16 वा दिवस; व्हर्टिकल ड्रिलिंगचं काम सुरू
  3. उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, 800 मिमीचे सहा पाईप टाकले

Last Updated : Nov 28, 2023, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.