ETV Bharat / bharat

Shraddha Walkar Murder Case : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवण्यासाठी आफताबने घेतला होता नवीन फ्रीज - लिव्ह इन पार्टनर हत्याकांड

आरोपी आफताबने सांगितले की, श्रद्धा (shraddha walker murder case Delhi) अनेकदा लग्नासाठी दबाव टाकत असे. (Aftab amin poonawa arrested) यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. 18 मे रोजी भांडणात त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. (Aftab killed shraddha Walkar)

Shraddha Walkar Murder Case
श्रद्धा वॉकर
author img

By

Published : Nov 14, 2022, 5:12 PM IST

नवी दिल्ली: 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर (live in partner murder case) श्रद्धा वॉकरची हत्या (shraddha walker murder case Delhi) करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक (Aftab amin poonawa arrested) करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून (Aftab killed shraddha Walkar) तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले (shraddha walker body dismembered) आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले. Delhi Crime, Latest news from Delhi

मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी घेतला स्पेशल फ्रीज - तो रोज रात्री 2 वाजता फ्लॅटमधून बाहेर पडत असे आणि 18 दिवस मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकत राहायचे. मृतदेह ठेवण्यासाठी त्याने 300 लिटरचा मोठा फ्रीज घेतला होता. मृतदेहाची दुर्गंधी घरात पसरू नये म्हणून तो अगरबत्ती पेटवत असे.

आफताबने केले धक्कादायक खुलासे - 8 नोव्हेंबर रोजी श्रद्धा वॉकरचे वडील 59 वर्षीय विकास मदन वॉकर यांनी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाचा एफआयआर दाखल केला. पोलिसांनी शनिवारी आफताबला त्याच्या फ्लॅटमधून ताब्यात घेतले असून त्याच्या सखोल चौकशीत झालेले खुलासे धक्कादायक आहेत.

लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांत भांडण - २६ वर्षीय श्रद्धा वॉकर ही मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीत कॉल सेंटरमध्ये काम करत होती. त्याचवेळी श्रद्धाची भेट आफताब अमीनशी झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि ते लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले. जेव्हा घरच्यांनी या नात्याला विरोध केला तेव्हा श्रद्धा आणि आफताब अचानक मुंबई सोडून मेहरौलीच्या छतरपूर भागात राहू लागले. आफताबने सांगितले की, श्रद्धा अनेकदा लग्नासाठी दबाव टाकत असे. यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे.

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जप्त - 18 मे रोजी भांडणात त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. आरोपी 28 वर्षांचा असून तो मुंबईचा रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही मृतदेहाचे काही तुकडे जप्त केले आहेत. मात्र तो मानवी शरीराचा भाग आहे की नाही हे आताच सांगू शकत नाही. ज्या शस्त्राने मृतदेह कापण्यात आला ते अद्याप मिळालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.