नवी दिल्ली - श्रध्दा खून प्रकरणातील आरोपी आफताबच्या नार्को चाचणीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला ५ दिवसांत आरोपी आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. आफताबच्याकडून माहिती मिळवताना पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत. सराईत गुन्हेगार असल्याप्रमाणे अनेक फसव्या तसेच दिशभूल करणाऱ्या गोष्टी आफताब त्याच्या चौकशीमध्ये सांगताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या नार्को चाचणीची मागणी केली होती. ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे. त्यामुळ त्याच्या पुढील चौकशीचा आणि योग्य माहिती मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खून प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती - महाराष्ट्रातील श्रद्धा वालकर हिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून देणाऱ्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याचे वास्तव एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. या खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याचवेळी तो दुसऱ्या मुलीला डेट करत ( Aftab was dating another girl ) होता.( Girl murdered in love affair in Delhi )पाच महिन्यांनंतर अटक: आफताबने मुंबईपासून 1,500 किमी अंतरावर असलेल्या दिल्लीच्या मेहरौली भागात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा (26) हिची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर आरोपींनी मृतदेहाचे अनेक तुकडे करून दिल्लीतील विविध भागात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. आता दिल्ली पोलिसांनी या हत्येचे गूढ उकलून आरोपी आफताब अमीन पूनावाला याला पाच महिन्यांनंतर अटक केली आहे.
फ्रीजमध्ये ठेवला होता मृतदेह : हत्येनंतर आरोपींनी श्रद्धाच्या मृतदेहाचे जे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते, त्याचा शोध पोलीस आता आफताबच्या माध्यमातून घेत आहेत. ते तुकडे फेकण्यासाठी आरोपी रोज रात्री 2 वाजता फ्लॅटमधून बाहेर पडत असे, असेही तपासात समोर आले आहे. ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला होता. अत्यंत नियोजनपूर्वक अशा पद्धतीने आफताबने हे कृत्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांच्यापुढील माहिती मिळवण्याचे आव्हान वाढले आहे. यामुळेच आता पोलिसांना त्याची नार्को चाचणी करण्यासाठी उत्सुक आहेत. या चाचणीमध्ये तो पोलिसांपासून लपवून ठेवत असलेली माहिती पुढे येण्याची पोलिसांना आशा आहे.