चंदीगड - फागवारा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्याला (एसएचओ) तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने भाजीपाला विक्रेत्याचा भाजीपाल्याला लाथ घालून पाडल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. नवदीप सिंग असे निलंबन झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
कापरुथालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कंवरदीप कौर यांनी पोलीस अधिकाऱ्याची सविस्तर चौकशी सुरू केल्याचे सांगितले. ते म्हणाले, की एसएचओ नवदीप सिंग यांनी गस्त घालत असताना रेहडी येथील रहिवाशी असलेल्या भाजीपाला विक्रेत्याशी गैरवर्तन केले. प्राथमिक चौकशी करून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा-कोरोना संक्रमणात औषधांच्या मदतीच्या नावावर होते प्रचंड लूट, व्हा सावध
डीजीपी दिनकर गुप्ता यांनीही ट्विट करून अधिकाऱ्यावरील कारवाईची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की गैरवर्तवणुक ही अत्यंत लाजिरवाणी आणि अस्वीकारार्ह घटना आहे. असे दुर्व्यवहरा कोणत्याही किमतीत स्वीकारले जाणार नाहीत. असे कोणी केले तर त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशाराही गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा-सुरत : मिकीसह मिनी माऊस चक्क कोविड सेंटरमध्ये दाखल; रुग्णांबरोबर केले नृत्य