लखनौ - उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा (UP Election Schedule 2022) निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यातील उत्तर प्रदेशची निवडणूक (UP Election 2022) भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाही (Shivsena) उतरली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) ज्या ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील त्या मतदारसंघात शिवसेना विरोधी पक्षांना मदत करणार असून, त्यासाठी शिवसैनिक जोमात काम करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष ठाकूर अनिल सिंह (Thakur Anil Singh) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
- 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल -
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
- निवडणुकीत भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि हिंदुत्व समोर येईल -
ठाकूर अनिल सिंह यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी ज्या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत, तेथे शिवसेना विरोधी पक्षात मजबूत उमेदवार उभा करेल. तसेच जेथून उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री निवडणूक लढवतील, तिथे शिवसैनिक त्यांना टक्कर देतील. या निवडणुकीत भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि हिंदुत्व समोर येईल, असेही ठाकूर अनिल सिंह यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. दावा त्यांनी केला.
- उत्तर प्रदेशात सेना काँग्रेससोबत जाण्याची शक्यता
दरम्यान, शिवसेनाही यूपी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससोबत युती करून भाजपचा पराभव करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेससोबत युती झाली नाही तरी शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपविरोधात जोरदार ताकद दाखवेल, असेही शिवसेना नेते सांगतात.
- मतदान तारखा -
उत्तर प्रदेश
पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा - 27 फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान
अधिक बातम्यांसाठी Log in करा -
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra