ETV Bharat / bharat

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज अयोध्येत.. शिवसेनेकडून जोरदार तयारी.. रामलल्लाचे घेणार दर्शन

महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले आदित्य ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहेत. ते जवळपास सहा तास अयोध्येमध्ये असणार आहेत. यादरम्यान ते भगवान श्रीरामाच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. तसेच काही धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jun 15, 2022, 7:24 AM IST

अयोध्या ( उत्तरप्रदेश ) : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरे श्री राम लल्लाच्या दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी अयोध्येत पोहोचून तयारीचा आढावा घेतला.

अयोध्येत आदित्य

असा आहे आदित्य ठाकरेंचा संपूर्ण दौरा

सकाळी 11.00 वाजता लखनौ विमानतळावर पोहोचतील

दुपारी 1.30 पर्यंत अयोध्येला पोहोचतील

दुपारी 3.30 वाजता आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.

4.45 वाजता इस्कॉन मंदिर, राम नगर येथे भेट देतील.

सायंकाळी साडेपाच वाजता रामललाचे दर्शन, श्री रामजन्मभूमी येथे पोहोचतील

संध्याकाळी 6.30 वाजता नवीन घाट अयोध्येत सरयू आरती करतील.

संध्याकाळी 7.30 वाजता लखनौला परत येतील

शिवसेनेकडून जय्यत तयारी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीतीरी होणाऱ्या गंगा आरतीत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

शिवसैनिक रेल्वेने अयोध्याला रवाना- 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्याला जाणार ( Aditya Thackeray leave for Ayodhya ) असले तरी कालपासूनच राज्यभरातून शिवसैनिक अयोध्याला पोहोचायला सुरुवात झाली ( Aditya Thackeray Ayodhya visit ) आहे. खासकरून पुणे मुंबई नाशिक येथून शिवसैनिक अयोध्याला रवाना झाले आहेत. मात्र अयोध्येत कोणतेही शक्तिप्रदर्शन शिवसेनेला करायचे नाही. अयोध्या हे हिंदू साठी श्रद्धास्थान आहे. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे तिकडे जात असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनीमाध्यमांशी बोलताना दिले.

शिवसेनेकडून बळकट होण्याचे प्रयत्न- मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा विरोधामुळे स्थगित करावा लागला. राज ठाकरे यांना कडाडून विरोध करणाऱ्या आयोध्या आणि उत्तर प्रदेश वासियांनी शिवसेना युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मात्र स्वागत केले ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नवीन फायरब्रँड नेते मानले जातात. शिवसेना हि हिंदुत्ववादी संघटना असल्याचा वारंवार उच्चार शिवसेनेकडून केला जातो. बाबरी मशीदीचा ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा हात असल्याचा वारंवार दाखला देत शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे असे सांगून हिंदू मतदारांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न शिवसेना वारंवार करते आहे.

हिंदुत्ववादी विचारांच्या मतांसाठी महत्त्वाचा दौरा- शिवसेना गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात आपले उमेदवार उभे करते आहे शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आले नसले तरी विचाराच्या आधारावर शिवसेना उत्तर प्रदेशात पाय पसरू पाहते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा त्या अर्थाने फारच महत्वाचा ठरतो. हळूहळू उत्तर प्रदेशात शिवसेना संघटन मजबूत करण्याकडे आदित्य लक्ष देत आहे तर आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईत असलेली उत्तर भारतीयांची संख्या पाहता हा दौरा त्यादृष्टीने ही शिवसेनेसाठी आणि हिंदुत्ववादी विचारांच्या मतांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील शिवसेनेसाठी ताकद देणारा दौरा - मनीषा भावसार : आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा उत्तर प्रदेशातील वाढू पाहणाऱ्या शिवसेनेचा शाखांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्य यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांना बळ मिळणार असून, त्यांचा हा दौरा उत्तर प्रदेशात अधिक फलदायी ठरेल असा विश्वास ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केला. राज यांना कडाडून होणारा विरोध आणि आदित्य यांचे स्वागत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. आदित्य यांच्या राजकीय कारकिर्दीची महाराष्ट्राबाहेरील मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ठरणार आहे असेही भावसार यांनी सांगितले.

हेही वाचा : Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे घेणार रामलल्लाचे दर्शन.. अयोध्येतून साधणार 'दिल्ली'वर निशाणा..?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.