लखनौ - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ( SP Supremo Akhilesh Yadav ) यांचे काका शिवपाल सिंह यादव ( shivpal singh yadav ) सध्या आक्रमक झाले आहेत. मी भाजपच्या संपर्कात आहे, तर अखिलेश यादव माझी विधिमंडळ पक्षातून हकालपट्टी का करत नाहीत, असे त्यांनी पक्षाला आव्हान दिले आहे.
शिवपाल यादव म्हणाले, की समाजवादी पक्षाच्या १११ आमदारांपैकी मी एक आहे. माझा भाजपशी संबंध असल्याबद्दल त्यांना माझी हकालपट्टी करण्याचा अधिकार आहे. शिवपाल यादव यांच्या या विधानाने पुन्हा एकदा मुलायम घराण्यातील वादाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवपाल आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक- वास्तविक अखिलेश यादव एक दिवसापूर्वी म्हणाले की, जे भाजपचे आहे ते माझे नाही. अखिलेश यांनी भाजपशी जवळीक करणारे काका शिवपाल सिंह यादव तसेच भाऊ प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादव यांना सूचक इशारा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून शिवपाल आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
शिवपाल सिंह यादव भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता-शिवपाल सिंह यादव लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या अनेक नेते त्यांनी ट्विटरवर फॉलो करतात. त्यामुळे शिवपाल यांची भाजप नेत्यांशी जवळीक किती आहे, याचा अंदाज लागू शकतो. यासोबतच शिवपाल यादव यांनी भाजपच्या अजेंड्यालाही नेहमीच पाठिंबा दिला.
प्रगतीशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल सिंह यांनीही टॅबलेट योजनेसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. त्यामुळे शिवपाल भाजपमध्ये जाण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यावर टीका केली आहे. तर पुतण्या अखिलेशच्या वक्तव्यावर काकांनी प्रत्युत्तर दिले आहे.