ETV Bharat / bharat

NCP Shivsena Allience in Goa Election : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती; उत्पल पर्रिकरांबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे. येणारी गोवा विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी या युती बद्दल निर्यण घेतला आहे. उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ( Sanjay Raut statement about Utpal Parrikar ) दिली आहे.

NCP Shivsena Allience in GOA Election
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती
author img

By

Published : Jan 19, 2022, 3:45 PM IST

Updated : Jan 19, 2022, 5:17 PM IST

पणजी - गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे. येणारी गोवा विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी या युती बद्दल निर्यण घेतला आहे. उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ( Sanjay Raut statement about Utpal Parrikar ) दिली आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत घोषित -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत घोषित करणार आहे

'अपक्ष लढल्यास उत्पल पर्रिकरांना आमचा पाठिंबा'
पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रिकरांनी अपक्ष निवडणूक वाढविल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहेत, मात्र भाजपने मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारल्यास हा मनोहर पर्रिकर यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आमच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत- प्रफुल्ल पटेल
महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे काँग्रेस पक्षात सहभागी असल्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, मात्र गोव्यात काँग्रेस ने अडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागत आहे, आमची लढाई ही लोकशाही पद्धतीने असणार आहे आम्ही गोव्यात कोणता पक्ष आमच्या समोर आहे हे पाहणार नाही.

विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

'...हा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंत'
काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची होती मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युती हवी होती. मात्र काँग्रेसच्या हट्टापायी हा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - AAP Goa CM Candidate : 'भष्ट्राचारमुक्त गोव्याची हमी देतो'; जाणून घ्या... कोण आहेत अमित पालेकर?

Last Updated : Jan 19, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.